कारंजा(Washim):- कारंजा तालुक्यातील विरगव्हाण येथील अनेकांना डायरियाची(diarrhea) लागण झाली. त्यातील दोन महिलां सह ज्ञानदेव धोटे ,रामदास धाये व प्रभाकर थेटे या पाच जणांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही जणांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले.
आरोग्य विभागाने या संदर्भात मार्गदर्शन व उपाययोजना कराव्या अशी मागणी
शिवाय काही जणांनी खाजगी दवाखान्यात (hospital) उपचार घेतले. विरगव्हाण या गावात केवळ डायरियाच नाही तर इतरही साथीचे रोग पसरले असून, आरोग्य विभागाने या संदर्भात मार्गदर्शन व उपाययोजना कराव्या अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. वारंवार मलप्रवृत्ती होणे , मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे, पोटात ढवळने, उलट्या होणे व जुलाब ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. उलट्या व जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार (Unhygienic diet)सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज स्थानिकांकडून वर्तविला जात आहे. लगतच्या गावातील काही जणांना देखील डायरियाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने(Department of Health) या गावात जाऊन सर्वेक्षण करून उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.