वसमत (Maratha Andolan) : तालुक्यातील बोराळा येथील मराठा आंदोलनात सक्रिय असलेले कार्यकर्ते गोपीनाथ जाधव यांचा मुंबई येथे रेल्वेतून पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे वसमत तालुक्यातील मराठा समाज व (Maratha Andolan) आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांवर दुःखाचे सावट पसरले आहे आमदार राजू पाटील नवघरे यांनी मुंबई येथे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.
वसमत तालुक्यातील बोराळा येथील मराठा आरक्षण आंदोलक गोपीनाथ सोनाजी जाधव वय ४८ वर्ष हे मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनासाठी गेले होते. आरक्षणाचा जीआर निघाल्यानंतर ते मुंबई येथील सानपाडा येथे जात असताना रेल्वेत पडून जखमी झाले मुंबई येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोपीनाथ जाधव हे अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सक्रीय होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक (Maratha Andolan) आंदोलनात मोर्चात त्यांनी सहभाग नोंदवला होता सातत्याने आरक्षण प्रश्नावरील आंदोलनात सहभागी होते. बोराळा येथील मराठा आंदोलनातील कार्यकर्ते गोपीनाथ सोनाजी जाधव हे रेल्वेमधून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती मुंबई येथील केईएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
आमदार राजु पाटील नवघरे यांनी तातडीने रुग्णालयात भेट देऊन आवश्यक त्या सर्व सोयी, तसेच तात्काळ रक्त उपलब्ध करून देत शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या (Maratha Andolan) घटनेने वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
