मनोज जरांगे पाटील यांचे परभणीतील समाजाला आवाहन
परभणी (Manoj Jarange Patil) : आगामी विधानसभा निवडणूकीत (Assembly Elections) २८८ उभे करायचे का पाडायचे हे नंतर ठरवू पण आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी हा लढा तीव्र करण्याची गरज आहे. ओबीसी समाजातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत तसे मराठा समाजातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे. जर (Maratha community) मराठा समाजाच्या विरोधात कोणी भुमिका घेतली तर त्याला येणार्या विधानसभेत पाडा, असे जाहिर आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी परभणीतील भव्य रॅलीला संबोधित करताना केले.
शिस्तप्रिय रॅलीला मोठा प्रतिसाद
परभणी शहरात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे रविवार ७ जुलै रोजी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाला होता. नुतन विद्यालयाच्या मैदानावरून दुपारी २ वाजता सुरू झालेल्या भव्य रॅलीत शिस्तीचे दर्शन समाज बांधवांनी दाखविले. रॅलीची सांगता सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ अभिवादन करून करण्यात आली. यावेळी (Maratha community) मराठा समाजाला संबोधित करतांना (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील म्हणाले १३ जुलैच्या आत राज्य सरकारने सगेसोयर्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्यांच्या नोंदीच्या आधारावर सर्वांना मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे.
अन्यथा मोठी समाजाची बैठक घेऊन आगामी विधानसभेत २८८ पाडायचे की उभे करायचे हे ठरवू.तसेच परत एकदा मुंबईला जावू, असे म्हणाले. (Maratha community) मराठा समाजातील लोकांनी गावखेड्यात ओबीसी बांधवांना त्रास द्यायचा नाही. तसेच ओबीसी बांधवांनी मराठ्यांना त्रास द्यायचा नाही. मराठा समाजाला त्रास देणारा ओबीसी नेता आगामी निवडणूकीत पाडायचा. या निवडणूकीत आपली ताकद काही जणांनी बघितली आहे. त्यामुळे ही एकजूट तुटू देऊ नका. गोरगरीब मराठ्यांना मोठे करण्याचे माझे स्वप्न असून त्यांच्याशिवाय पाण सुध्दा हलले नाही पाहिजे, वेळ आली तर आरक्षणासाठी बलीदान देईन मात्र मागे हटणार नाही. मला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मी माझी निष्ठा कधिच घाण ठेवणार नाही किंवा कोणालाच घाबरणार नाही. सरकार ओबीसी नेते अंगावर घालत असून मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीस यांनी ठरलेले आरक्षण मराठा समाजाला द्यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारले केले.
मराठा समाज बांधवांनी दाखविले एकजूटीचे दर्शन
शहरात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये (Maratha community) मराठा समाज बांधवांनी शिस्तीसह एकजूटीचे दर्शन दाखविले. संपूर्ण रॅलीमध्ये ठिक-ठिकाणी स्वयंसेवकांनी वाहतुक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले. त्याला एकजूटीने समाज बांधवांनी प्रतिसाद देत शिस्तीत सर्व रॅली पार पाडण्यात सहकार्य केले.