परभणीतील गंगाखेड येथील खळी फाटा येथे मराठा समाज संवाद सोहळ्याला प्रतिसाद
परभणी/गंगाखेड (MLA Dr. Ratnakar Gutte): गेल्या विधानसभा निवडणुकीत मी अतिशय मोठ्या संकटात सापडलो होतो. सगळीकडून संकटे होती. तरीही मी विधानसभा निवडणूक तुरुंगातून लढवली. या संकटकाळी मराठा समाज बांधवांनी मोलाची साथ देऊन मला विजय केले. हे मराठा समाजाचे उपकार मी कधीही विसरणार नाही असे भावनिक उदगार आ. डॉ. रत्नाकर गुट्टे (MLA Dr. Ratnakar Gutte) यांनी येथे काढले.
तालुक्यातील मौजे. खळी फाटा येथे आयोजित मराठा समाज संवाद सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध पदाधिकार्यांनी आपल्या भावना व्यक्त करून मतदारसंघातील विकासकामे जनतेसमोर ठेवली. तसेच यंदाही गुलाल उधळणारचं, हा निर्धार व्यक्त केला. पुढे बोलताना आ गुट्टे म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आजही आहे आणि उद्याही राहीन, ही (MLA Dr. Ratnakar Gutte) ग्वाही दिली.
संकटाच्या काळात आणि मी प्रचारात नसताना सुद्धा माझ्या मराठा समाज बांधवांनी विधानसभेत पाठवून मला मदत केली आहे. त्यामुळे त्यातून उत्तराई होण्यासाठी मी सुद्धा अहोरात्र परिश्रम करून गावोगावी विकासाची गंगा पोहोचवली आहे. कोट्यावधी रूपयांची कामे मार्गी लावली होती. पक्ष, गाव, जात आणि धर्म न पाहाता लोकहिताला प्राधान्य देवून अनेक प्रश्न, समस्या व अडचणी सोडविल्या आहेत. परिणामी, अनेक वर्ष प्रलंबित असलेली कामे पूर्ण झाली आहेत. म्हणून माझ्यासह नागरिक समाधानी आहेत. त्यामुळे माझे सर्वांशी कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातली ही माय-बाप जनता मला दुसर्यांदा सेवेची संधी नक्की देईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
महायुती सरकारने राज्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री, मोफत गॅस सिलेंडर, मोफत वीज, मोफत बस प्रवास, पन्नास टक्के बस सवलत या सारख्या अनेक योजनांमुळे जनसामान्यांमध्ये महायुतीला मोठा जनाधार मिळत आहे. मतदारसंघातील जनता हेच माझं कुटुंब असल्याने मला प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्याचे आयोजन कृष्णाजी साळुंखे,दासराव भोसले,संदीपराव वाळके,शिवा पवार, कुलदीप जाधव यांनी केले होते.