हिंगोली (Manoj Jarange Patil) : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जिल्हयातील बलिदान दिलेल्या कुटूबियांचे भेट घेऊन सात्वंन केले. यावेळी त्यांनी शासनाची मदत मिळाली का? या संदर्भात विचारणा करुन माहिती जाणुन घेतली. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी सहकार्यांना मदत न मिळालेल्या बलिदान दिलेल्या कुटूंबियांची माहिती घेण्याचे व संपुर्ण यादी देण्याच्या सुचना केल्या.
शनिवार दि.६ जुलै रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हिंगोली जिल्हयातील मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन केले. आस्थेवाईक सात्वंन केल्यामुळे कुटूंबियांना मोठा आधार मिळाला आहे. यावेळी बलिदान दिलेले १२ कुटूबियांमध्ये कपिल गणेशराव मगर रा.सिंदगी ता.कळमनुरी, प्रविण देवराव कल्याणकर रा.कंजारा ता.औंढा नागनाथ, निवृत्ती नामदेव संवडकर रा.टेंभुर्णी ता.वसमत, चंद्रकांत अजबराव पतंगे रा.कांडली ता.कळमनुरी, पांडुरंग गोपाळकराव सुर्यवंशी रा.चिखली ता.कळमनुरी, रत्नमाला गुलाबराव सोळंके रा.येहळेगाव ता.औंढा नागनाथ, गजानन पुरभाजी इंगोले रा.कुरुंदा ता.वसमत, ज्ञानेश्वर प्रतापराव दळवी रा.कुरुंदा ता.वसमत, विलास श्रीराम वामन रा.माळसेलु ता.हिंगोली, विठ्ठल दत्तराव गायकवाड रा.खंडाळा ता.हिंगोली, बालाजी सुधाकर नेहल रा.वडद ता.औंढा नागनाथ, गोविंद शिवाजी राखोंडे रा.नळेगाव ता.औंढा नागनाथ यांचा सामावेश होता.