गुंडा येथील घटना; गळफास घेवुन संपविली जिवनयात्रा
हिंगोली (Maratha reservation) : वसमत तालुक्यातील गुंडा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका ३२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केली. सलग दुसर्या दिवशी ही आत्महत्येची घटना घडली आहे. वसमत तालुक्यातील गुंडा येथील एकनाथ भगवानराव चव्हाण (३२) हे मध्यतरी (Maratha reservation) मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रीय होते. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता.
मराठा आरक्षणाकरीता शासन चालढकल करीत असल्याने मागील काही दिवसांपासुन ते अस्वथ होते. (Maratha reservation) आरक्षण द्यावे या मागणीचे स्टेटस मोबाईलवर त्यांनी दोन ते तिन दिवसांपासुुन ठेवले होते. २९ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास शेतातील आखाड्यावर होते. रात्री बर्याच उशीरापर्यंत ते घरी आले नसल्याने त्याचे वडील भगवानराव चव्हाण यांनी शेतात जावूून पाहणी केली असता एकनाथ चव्हाण याचा मृतदेह शेतातील आखाड्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आला. या घटनेची माहिती हट्टा पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सग्राम जाधव, जमादार दत्तात्रय कावरखे, महेश अवचार, प्रफुल आडे, सुर्यकांत भारशंकर यांनी भेट दिली. एकनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत एकनाथ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणा करीता सलग दुुसरी आत्महत्येची घटना घडली आहे.
सलग दुसरी आत्महत्या
मराठा आरक्षणाकरीता आत्तापर्यंत २६ जणांनी आत्महत्या केली. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील राजु शेषराव काळे यांनी आत्महत्या केली असता आता एकनाथ चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे.
खिशात आढळली चिठ्ठी
एकनाथ चव्हाण हे मराठा आरक्षणाकरीता सक्रीय असताना त्यांनी गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात एक चिठ्ठी आढळली असून त्यात (Maratha reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करीत असल्याचे नमुद केले आहे.