मुंबई (Manoj Jarange) : मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व सांभाळणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या जीवाला धोका असून त्यांना राज्य सरकार ने सुरक्षा देण्याची मागणी केली जात होती. ही मागणी मेनी करत सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी झाली होती. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचं घर आणि उपोषणस्थळाच्या भोवती ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवल्याचा संशय होता. त्यानंतर मराठा समाजाने आक्रमक होत मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती.
बुधवार, दि. ३ जुलै रोजी जरांगे पाटलांना (Manoj Jarange) झेड प्लस सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील ते राहतात त्या निवासस्थानी आणि आंदोलनाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अज्ञात ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून त्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात येत होती.
ही मागणी पाहता मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange) सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पाटलांसोबत आता चार शस्त्रधारी पोलिस आणि एक पोलिस व्हॅन तैनात असेल. मंत्री शंभुराज देसाई यांनी ही माहिती दिली. शंभूराज देसाई म्हणाले की, विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी अंतरवाली सराटी इथला मुद्दा मांडला होता. याबाबत पोलिस अधीक्षकांनी अहवाल दिला आहे. त्यानुसार, रात्रीचं ड्रोन सर्वेक्षण (Drone survey) झालं होतं, त्याची तीन पथकांमार्फत चौकशी करण्यात आलीय. त्यामुळेच जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांच्यासोबत चार पोलीस आणि एक पोलीस वाहन सुरक्षेसाठी तैनात असेल, अशी माहिती देसाईंनी यांनी विधानसभेत दिली.