हिंगोली (Manoj Jarange Patil) : मराठा आरक्षणाकरीता (Maratha Reservation) मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करीत असल्याने सरकार मला एकाकी पाडू पाहत आहे त्यामुळे मराठा समाजाने माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हिंगोलीत रविवारी सकाळी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
७ जुलै रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत (Maratha Reservation) मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असून हेच माझे स्वप्न आहे. समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर गोरगरीबाचं लेकरू कलेक्टर झालं पाहिजे, हेच माझे स्वप्न आहे. आज परिस्थितीमध्ये आरक्षणाकरीता उभारलेल्या लढ्यात संपूर्ण मराठा समाज माझ्या पाठिशी भक्कमपणे उभा असल्याने शासनाला वेळोवेळी आरक्षणाचा विचार करावा लागत आहे.
येत्या १३ तारखेपर्यंत शासनाने (Maratha Reservation) आरक्षणाचा मार्ग लावला नाही तर पुन्हा मुंबईला येण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, तसेच मराठा समाजाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून आगामी निवडणुकीत २८८ पाडायचे की २८८ उभे करायचे हा सुद्धा निर्णय घेण्यास आम्हाला भाग पाडू नका असा इशारा जरांगे यांनी दिला. तसेच सत्तेतील काही व्यक्तींनी विनाकारण मराठा व ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण केला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही व त्यांच्या (Maratha Reservation) आरक्षणाला कोणी धक्काही लावणार नाही, त्यांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली.