भाजप आमदार अमित साटम यांची मागणी
मुंबई (Maratha Reservation) : राज्यात जातीय संघर्ष घडवून आणणाऱ्या आणि फेक नरेटीव्ह पसरवून समुदायांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या सभागृहाच्या मराठवाड्यातील सदस्याच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली. सरकारने (Maratha Reservation) मराठा आरक्षणावर मंगळवारी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाने बहिष्कार घातल्याचा मुद्दा उपस्थित करत साटम (MLA Amit Satam) यांनी ही मागणी केली.
एसएमएस आणि व्हॉट्सॲपवर मेसेज शेअर करून समाजात तेढ निर्माण करणारा कोण प्रतिनिधी आहे, हे जनतेला कळले पाहिजे. त्यासाठी एसआयटी चौकशी करण्याची मागणी साटम (MLA Amit Satam) यांनी केली. आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे साटम यांनी सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय आरक्षण बैठकीला विरोधी पक्षाने बहिष्कार घातल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षावर कडाडून टीका केली.
साटम (MLA Amit Satam) म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) काल सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात जातीच्या नावावर तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे आणि ओबीसी एकमेकांच्या लग्नाला जात नाहीत अशी प्रकारचे वातावरण तयार झालेलं आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र विरोधी पक्षाने त्यावरती बहिष्कार घातला. विरोधी पक्षाला मराठा किंवा ओबीसी समाजाशी काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. आज माझं विरोधी पक्षांना जाहीर आव्हान आहे की ओबीसी मधून (Maratha Reservation) मराठ्यांना आरक्षण द्यायला त्यांचा पाठिंबा आहे की नाही हे जाहीर करून टाका, असे आव्हान साटम (MLA Amit Satam) यांनी विरोधी पक्षांना दिले.
साटम पुढे म्हणाले, सरकार सर्वपक्षीय बैठक आरक्षणावर घेत असताना विरोधी पक्ष निवडणुकीच प्लॅनिंग करण्यात व्यस्त होता. त्यांचा (Maratha Reservation) मराठा आरक्षण प्रश्नावर पर्दाफाश झालेला आहे. त्यांना जाती जाती मध्ये तेढ निर्माण करायची आहे. सलोख्याचे वातावरण बिघडवयाचे आहे, असा आरोप साटम (MLA Amit Satam) यांनी केला. या मुद्यावर भाजप आमदार आशीष शेलार, नितेश राणे यांनीही याविषयावर मते व्यक्त केली. भाजप आमदार आक्रमक झाल्यानंतर सभागृह तीन वेळा तहकूब करण्यात आले.