परभणी/जिंतूर (Maratha Reservation) : तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने वडीगोद्री येथे (Maratha samaj) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये. यासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके व वाघमारे यांना पाठींबा म्हणून जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढून अण्णा भाऊ साठे चौकात तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान दोन तासांच्या (Maratha Andolan) आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावचे नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी (Maratha samaj) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणा सुरूच असल्यामुळे दोघांची प्रकृती खालावत चाललेली आहे. यामुळे ओबीसी समाज सर्वत्र आक्रमक होत चालेला आहे म्हणून तालुक्यातील सकल (OBC Samaj) ओबीसी समाजाच्या वतीने मोंढा येथून भव्य मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा शहरातील विविध भागातून जालना रोडवरील अण्णा भाऊ साठे चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात यावेळी विविध (OBC Samaj) ओबीसी नेत्यांनी आपापली मते नोंदवली यावेळी तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. यामुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्तारोको आंदोलनात सुरेश नागरे,विशाल बुधवंत,बाळासाहेब घुगे,नानासाहेब राऊत,अविनाश काळे,अँड विनोद राठोड,लक्ष्मण बुधवंत, प्रमोद कराड,गजानन वऱ्हाड, राजेश चव्हाण,प्रसादराव बुधवंत,प्रा वजीर,दिगंबर चव्हाण,केशव घुले,संदीप आघाव, अनिल शेंदरे,अशोक बुधवंत,राहुल घुले,कृष्णा टाकरस,यांच्यासह सकल ओबीसी समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.