शिकुनही मुलांना नौकरी लागत नसल्याने घेतला टोकाचा निर्णय
आखाडा बाळापूर (Maratha reservation) : येथे एका इसमाने ४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास आत्महत्या केली. मुलांना शिकुनही नौकरी लागेना, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलीस पथकाने भेट दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील मरडगा येथील दिलीप किशनराव काळे (वय ५८वर्षे) हे आखाडा बाळापूर रामनगर भागात राहत होते. बुधवार रोजी दुपारी बारा वाजता घरातील हॉलमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आम्हाला (Maratha reservation) आरक्षण नसल्याने व मुलांना शिक्षण घेऊन नोकरी लागत नसल्याने या कारणांमुळे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आसल्याच लिहून ठेवले होते. सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, रामदास ग्यादलवाड, राजीव जाधव, शिवाजी पवार, विजय जाधव यांनी दिली.
यापूर्वीही अनेक आत्महत्या
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा, कान्हेगाव, पिंपरी, डिग्रस, कोंढूर, देवजना, डोंगरगावपूल बरोबर विविध ठिकाणी (Maratha reservation) मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झालेल्या आहेत. शासनाने लवकरात लवकर मराठा आरक्षण प्रश्न लवकर सोडण्याची सातत्याने मागणी समाजाच्या वतीने होत आहे.