मराठा समाजाला केली विनवणी
हिंगोली (Maratha Reservation) : शासन मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देत नसल्याने माझ्या कडे काहीही पर्याय नाही त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, माझ्या सकल मराठा बांधवांना विनंती आहे मनोज दादा जरांगे (Manoj Jarange patil) यांना एकटे सोडू नका अशी चिठ्ठी लिहून वसमत तालुक्यातील अकोली ता. वसमत येथील एका २२ वर्षीय तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या (Maratha Youth Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी १० ऑगस्टला आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील अकोली येथील नागोराव माधवराव कदम (२२) त्यांच्या आई, वडिलांचे छत्र हरविल्यामुळे त्याच्या भाऊ व वहिनी सोबत राहात होते. भावाला शेतीकामात मदत करून त्यांचा उदरनिर्वाह होत होता. दरम्यान, हिंगोली जिल्हयात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात नागोराव यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच जिल्हयातील मराठा आरक्षणाच्या सभेमध्ये स्वयंसेवक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण दिले जात नसल्याने ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. (Maratha Reservation) समाजाला आरक्षण कधी मिळेल, आपल्या समाजातील मुलांना त्याचा कधी लाभ मिळेल असे ते नेहमीच मित्रांना बोलत होते. दरम्यान, ९ ऑगस्ट शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते जेवण करून खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यांनी आतून कडी लाऊन लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या (Maratha Youth Suicide) केली. काही वेळानंतर हा प्रकार लक्षात येताच त्याच्या कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत बघितले असता मयत नागोराव यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, जमादार एस. डी. गोरे, विभूते, विजय उपरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना मयत नागोराव यांच्या खिशात चिड्डी आढळून आली आहे. या प्रकरणी संतोष कदम यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार गोरे पुढील तपास करीत आहेत.