शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण
परभणी (Maratha samaj) : सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून (Maratha samaj) मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश केले जाणार आहेत. या बाबत शिक्षण संचालक उच्च शिक्षण डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या स्वाक्षरीने १८ जून रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे. सर्व विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण, कुलसचिव, अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठांना परिपत्रकाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. (Maratha samaj) मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक सवलती लागु झाल्या आहेत.
शिक्षण संचालकांनी काढले परिपत्रक
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासाठी आंदोलन सुरू आहे. शासनाने (Maratha samaj) मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण दिले आहे. १० टक्के आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. या आरक्षणातून आता शैक्षणिक प्रवेश होणार आहेत. तसेच शासकीय नोकरीमध्ये देखील आरक्षणाच्या अनुषंगाने जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थां व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत किंवा अनुदान प्राप्त नसोत यामधील प्रवेशांना सदर आरक्षण नियम लागु राहणार आहे. या बाबत काटेकोर अंमलबजावणी करण्या विषयी तात्काळ सूचना देण्यात आल्या आहेत. (Maratha samaj) मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश आता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासप्रवर्ग या संवर्गातून होणार आहेत. त्याच बरोबर राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील आणि पदावरील नियुक्तींकरीताही जागांच्या आरक्षणाविषयी परिपत्रकात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.