मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते दिनांक 28 सप्टेंबर रोजी भूमिपूजन सोहळा
नाशिक (Maratha Samaj Hostel) : आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक येथे डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या 500 मुले व पाचशे मुली यांचे वस्तीगृह (Maratha Samaj Hostel) तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) या संस्थेचे विभागीय कार्यालय या कामाचे भूमिपूजन 28 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या माध्यमातून सदर काम मंजूर करण्यात आलेले आहे.
त्र्यंबकरोड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमदार प्रा. देवयानी सुहास फरांदे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या माध्यमातून 500 मराठा मुली व 500 मराठा मुले यांच्यासाठी (Maratha Samaj Hostel) वसतिगृह बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकल्प 158 कोटी 99 लाख 90 हजार 830 रुपयांचा असेल.
आमदार प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी 500 मुले व पाचशे मुली यांच्यासाठी वसतिगृह बांधण्याचे काम मंजूर करून घेतले आहेे. या वसतिगृहामुळे मराठा समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नाशिक येथे राहण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्र्यंबकरोडवरील शासकीय दूध डेअरीच्या परिसरात वसतीगृहाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होत आहे गट क्रमांक 1056/1057 या जागेत हे वसतिगृह साकारण्यात येत आहे.
दिनांक 28 सप्टेंबर रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या वस्तीगृहाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यासह राज्यातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून नाशिककर नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे.
हे होणार फायदे
वसतिगृहाच्या निमित्ताने शहरात शिक्षण घेण्याची आणि त्यासाठी रहिवास मिळण्याची मोठी अडचण दूर होणार मराठा समाजातील गरीब घटकांतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात राहणार वसतिगृहाच्या माध्यमातून समाजातील अनेक गुणवंतांना प्रोत्साहन मिळेल याच वसतिगृहातून चांगले प्रशासकीय अधिकारी, नोकरदार, व्यावसायिक, घडतील.
या बाबींची घेतली जाईल काळजी:
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत हे वसतिगृह मोलाची भूमिका बजावणार आहे. विद्यार्थ्यांचे हे वसतिगृह असे असेल की ते त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यक्तिगत विकासासाठी अनुकूल वातावरण प्रदान करेल. हे (Maratha Samaj Hostel) वसतिगृह असे असेल की त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक गरजांची पूर्तता होईल. त्यामुळे पुढील बाबींची काळजी घेण्यात येणार आहे.
शुद्ध पाणी : विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची व्यवस्था असेल तर आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा असेल
निरंतर इंटरनेट सेवा : विद्यार्थ्यांना मोठा माहितीचा स्त्रोत उपलब्ध असावा या दृष्टीने निरंतर इंटरनेट सेवा दिली जाईल.
ग्रंथालय : विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींचे जीवनचरित्र कळावे, त्यांचे विचार कळावेत, त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी यासाठी सुसज्ज ग्रंथालय साकारण्यात येईल.
सुरक्षितता : विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि इतर सुरक्षिततेच्या उपाययोजना असतील
स्वच्छता : वसतिगृहात स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे. नियमित स्वच्छता करणे, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता संबंधित नियम पाळणे याला महत्त्व दिले जाणार आहे.
आहार : विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि स्वच्छ आहार मिळावा. वसतिगृहात एक स्वच्छ आणि सुसज्ज भोजनालय तयार करण्याचे विचारात आहे.
मनोरंजन आणि खेळ : विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी मनोरंजन आणि खेळांच्या सुविधा असतील.
समुपदेशक : विद्यार्थ्यांचे मानसिक प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र समुपदेशाकाची नेमणूक करण्याचा मानस आहे.
वस्तीगृहाबाबत महत्त्वाचे मुद्दे
– 500 मुलांचे वसतिगृह
– 500 मुलींचे वसतिगृह
– 300 विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका
– 50 अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
– अत्याधुनिक लिफ्टची व्यवस्था
– रेन वॉटर हार्वेस्टिंग
– सी. सी. कॅमेर्यांच्या माध्यमातून इमारतीवर वॉच
– विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक वातावरण
– प्रशस्त मिटिंग हॉल
– इमारतीच्या परिसरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते
– इमारतीच्या परिसरात आकर्षक बगीचा तसेच वृक्षवेली
– विद्यार्थी व कर्मचार्यांसाठी सर्व सुविधायुक्त फर्निचर