ज्येष्ठ पत्रकार भाउ तोरसेकर यांची खंत
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
राज्य, विभाग व जिल्हास्तरिय पूरस्कारांचे वितरण
मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार सोहळा
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
राज्य, विभाग व जिल्हास्तरिय पूरस्कारांचे वितरण
मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार सोहळा
अमरावती (Marathi Journalists Association) : महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याच्या वाटचालीचा विचार केला तर 1970 नंतर अचानक महाराष्ट्र फुले-शाहु-आंबेडकरांचा झाल्याचे आपल्या लक्षात येईल. पण आंबेडकर म्हणायचं, महापुरुषांचं नाव घ्यायचं, मात्र त्यांचे विचार अंगीकारणे तर दूरच आपण ते वाचले तरी आहे काय? समजून तरी घेतलेत काय? हे तपासण्याची गरज आहे. फुले-शाहु-आंबेडकर हा विचार आहे. पण आज दुर्दैवाने विचार बाजूला पडला आणि त्याचा अजेंडा झालेला आहे, जेवणात मीठ जसे चवीनुसार वापरले जाते तसे राजकारणात या महापुरुषांच्या विचारांचे झाले आहे. राजकारण्यांकडून फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांसोबतच त्यांच्या नावाचाही केवळ स्वार्थासाठी वापर केला जात आहे. अशी खंत ज्येष्ठ पत्रकार (Marathi Journalists Association) आणि स्तंभलेखक व वक्ते भाउ तोरसेकर यांनी व्यक्त केली.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने (Marathi Journalists Association) आज भाउ तोरसेकर यांचा राज्यस्तरिय जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हव्याप्र मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसदकर ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या पूरस्कार वितरण सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना भाउ तोरसेकर बोलत होते. त्यांना स्व. दादासाहेब काळमेघ जीवन गौरव पूरस्काराने सन्मानित करण्यात आले. 41 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पूरस्काराचे स्वरुप होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ मंचावर उपस्थित होते.
या समारंभात दै. लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने (Shrimant Mane) यांना स्व. जुगलकिशोर अग्रवाल स्मृती राज्यस्तरिय पत्रकारिता पूरस्कार प्रदान करण्यात आला. 31 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे पूरस्काराचे स्वरूप होते. दै. भास्करच्या उपसंपादक सौ. गीता तिवारी यांना राहुल गडपाले यांनी पुरस्कृत केलेल्या विभागीय पत्रकारिता पूरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. दै. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी सुरेंद्र चापोरकर यांना दै. विदर्भ मतदार पुरस्कृत जिल्हास्तरिय (शहर) आणि धामणगाव रेल्वे येथील प्रतिनिधी मंगेश भुजबळ यांना दै. जनमाध्यम पुरस्कृत जिल्हास्तरिय (ग्रामीण) पत्रकारिता पूरस्कार प्रदान करण्यात आला. या दोन्ही पूरस्कारांचे स्वरुप 11 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे होते.
भाउ तोरसेकर पुढे म्हणाले की, आज पत्रकारांनी (Marathi Journalists Association) सत्ताधार्यांना प्रश्न विचारले पाहीजे. पण स्वत:ला जाणकार म्हणवून घेणारे पत्रकार त्यात कमी पडत आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रशंसक आहे, पण त्यांनी दावोसवरुन गुंतवणूक आणल्यानंतर त्यांच्यासमोर प्रश्न उभे केले आहेत. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात वाल्मिक कराडसारखे खंडणीखोर आहेत. ते उद्योजकांना त्रास देतात. त्यांचे अस्तित्व कायम राहीले, तर जेवढी गुंतवणूक आणली जाईल, ती अशा गुंडांमुळे परत गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार काय करणार आहे, असा सवाल आपण मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केल्याचे तोरसेकर म्हणाले. भाउ तोरसेकर यांनी ईव्हीएमवर विरोधकांकडून उपस्थित केल्या जात असलेल्या शंकेवरही भाष्य केले. ते म्हणाले मतदानासाठी कोणतीही पद्धत आणली तरी ज्यांना तक्रार करायची आहे, ती ते करणारच, इतिहास हेच सांगतो.
53 वर्षांपूर्वी इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत मिळाले तेव्हाही हा विजय बाईचा किंवा गाईचा नसून शाईचा विजय आहे, अशी टीका करुन निवडणूक पद्धतीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्या काळात ईव्हीएम नसतांना मतपत्रिका, मतपेट्या पळविल्याचे आरोप केले जायचे. आज विरोधकांकडून पराभव झाला की, ईव्हीएममध्ये खोट काढण्यात येते. विजय झाला की, त्यांच्याचसाठी तो विजय लोकशाहीचा विजय असतो. त्यामुळे या आक्षेपांना काहीच अर्थ नाही. तुम्ही एकदा मॅच खेळायला उतरले आणि पंचाचा निर्णय तुमच्या विरोधात असला, तुम्हाला पटण्यासारखा नसला तरी तो मान्य केलाच पाहीजे. तुम्ही जेव्हा ईव्हीएमवर शंका घेता तेव्हा तुम्ही मतदारावर शंका घेता आणि जेव्हा मतदारावर शंका घेता तेव्हा तुम्ही लोकशाहीवर शंका घेत असता, मतदानाच्या अधिकारावर शंका घेत असता, हे ध्यानात ठेवले पाहिजे, असे भाउ तोरसेकर म्हणाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) म्हणाले की, कोणताही राजकिय वारसा नसताना, मोठ्या पक्षाचा पाठिंबा न घेता माझ्यासारखा कार्यकर्ता वीस वर्ष आमदार म्हणून निवडून आला. चांगल्या पत्रकारितेचा त्यासाठी आपल्याला फायदा झाला. मात्र आजच्या काळात वातावरणही गढूळ झाले आहे आणि पत्रकारिताही बदलली आहे. लोकहितासाठी आम्ही जी कामे करतो, जे प्रश्न मांडतो त्यासंबंधीच्या बातम्या आज छापून येत नाही किंवा दाखविल्या जात नाही. असे म्हणतात की, पूर्वी वर्तमानपत्र आधी छापले जायचे आणि नंतर विकले जायचे आता उलट झाले आहे. आता असं म्हणतात की, (Marathi Journalists Association) वर्तमानपत्र आधी विकले जाते नंतर छापले जाते, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. आज संपूर्ण व्यवस्थाच बिघडली आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत सत्य मांडणे आव्हानात्मक आहे. अनेक पत्रकार आज सत्य मांडण्याचे काम करित आहेत, ही समाजासाठी चांगली बाब आहे. असे बच्चू कडू (Bachu Kadu) म्हणाले.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ म्हणाले की, स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या नावाने जिल्हा (Marathi Journalists Association) मराठी पत्रकार संघाने सुरु केलेला हा पहिला जीवनगौरव पूरस्कार दिला जात आहे, याचा आपल्याला अत्यंत आनंद आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यापूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र केसरी नावाने एक नियतकालिक सुरु केले होते. लोकशिक्षण आणि विचारविनिमयाचे प्रभावी माध्यम म्हणून भाउसाहेबांनी त्याचा वापर केला होता. भाउसाहेबांच्या अमरावती जिल्ह्यात त्यांचे ते कार्य आज जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून पूर्ण केले जात असल्याचे हेमंत काळमेघ म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संचाचे सरचिटणीस प्रफुल्ल घवळे यांनी तर संचालन प्राजक्ता मशिदकर यांनी केले. संजय बनारसे यांनी आभार मानलेत. पाहुण्यांचे स्वागत उल्हास मराठे, त्रिदिप वानखडे, विजय ओडे, सुधीर भारती, मंगेश तायडे, गौरव इंगळे, संजय शेंडे, अरुण तिवारी, अनुप गाडगे, मनोहर परिमल, लोभस गडेकर, सुधीर केने, प्रणय निर्वाण यांनी केले.
दडपणातूनही पत्रकारिता उभारी घेते : अनिल बोंडे
राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांवर टाकण्यात आलेल्या बंधनांची आठवण काढली. तेव्हा सत्ताधार्यांनी वृत्तपत्रांचेही तोंड दाबून ठेवले होते. पण प्रचंड दडपण असतानाही ते झुगारुन धाडसाने पत्रकारितेने पून्हा उभारी घेतली. पुर्नर्जिवित झाली. पुढे त्याच (Marathi Journalists Association) पत्रकारितेने देशात सत्ता बदल घडवून आणला आणि लोकशाही अखंडपणे सुरु राहीली, असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले. आणीबाणीचा विचार करता किंवा आज अन्य देशांत पत्रकारितेवर असलेली बंधने पाहता, भारतात मात्र या क्षेत्राला पूर्णत: मोकळीक आहे. वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्या मुक्तपणे आपली मते मांडू शकतात. असे डॉ. बोंडे म्हणाले. पूर्वी सत्तेचे केंद्र पश्चिम महाराष्ट्रात असायचे. त्यामुळे विदर्भाचे प्रश्न सोडविताना नेत्यांना बरेच परिश्रम करायला लागायचे. अन्याय होत आहे, हे स्पष्ट दिसायचे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) नितीन गडकरी यांच्यामुळे सत्ता केंद्र विदर्भात आहे. विदर्भाच्या प्रगतीसाठी त्याचा लाभ होत आहे. जनतेच्या पल्लवित झालेल्या आशा पूर्ण होत आहे, असे अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) म्हणाले.
पहिला पूरस्कार सदैव स्मरणात राहणार: अनिल अग्रवाल
कोणत्याही गोष्टीची सुरुवात आणि शेवट सदैव स्मरणात राहत असतो. अमरावती जिल्हा (Marathi Journalists Association) मराठी पत्रकार संघाने यावर्षी पासून राज्यस्तरावर पूरस्कार प्रदान करण्याची परंपरा सुरु केली आहे. भाउ तोरसेकरांसारख्या पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वाला पूरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. हा पहिला पूरस्कार सदैव स्मरणात राहणारा आहे, असे उद्गार अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात बोलताना काढले. (Marathi Journalists Association) जिल्हा पत्रकार संघातर्फे पूरस्कार देण्याच्या उपक्रमाचा विषय पुढे आला तेव्हाच हा पूरस्कार जिल्हा व विभागीय पातळीसोबतच राज्यस्तरावर देण्याचा विचारही मांडला गेला. त्याला सर्वांनी होकार दिला आणि आज त्याची पूर्तता होत असल्याचे अनिल अग्रवाल म्हणाले. जीवनगौरव पूरस्काराला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे दिवंगत अध्यक्ष व जिल्ह्यातील थोर नेते स्व. दादासाहेब काळमेघ यांचे नाव मिळाल्याने या पूरस्काराची शोभा वाढली आहे, असे अनिल अग्रवाल म्हणाले. सर्व पूरस्कर्त्यांसोबतच मोठ्या संख्येने समारंभाला उपस्थित झालेल्या अमरावतीकरांचेही प्रतिसादाबद्दल अग्रवाल यांनी आभार मानलेत.
इतिहास प्रेरणा घेण्यासाठी असतो: श्रीमंत माने
इतिहास हा काहीतरी मिळवण्यासाठी किंवा गर्व बाळगण्यासाठी नसतो त्यातून प्रेरणा घ्यायची असते. एकेकाळात वर्हाड व अमरावती जिल्हा ऐश्वर्यसंपन्न होता. अमरावती शहरानं देशाला खूप काही दिलं आहे. पण आज येथील लोकांना त्याचा विसर पडला आहे. आताच्या राजकारणात खोट्या अभिमानाच्या मागे आपण आपली तत्व विसरून गेलो आहोत. यावर बोलण्याची गरज आहे. (Marathi Journalists Association) पत्रकारांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना राज्यस्तरिय पत्रकारिता पूरस्कार प्राप्त दै. लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांनी व्यक्त केली. स्वतंत्र राज्य झाल्याने या प्रदेशाचे प्रश्न सुटू शकत नाही, याची जाणीव आपल्याला गांभीर्याने झाली आहे. आज आपलेच मुख्यमंत्री आहेत, आपलेच कर्तबगार केंद्रीय मंत्री आहेत.
गुंतवणूक येईल, प्रगती साधली जाईल. तरी या प्रदेशाला स्वतंत्र ओळख आहे, स्वतंत्र अस्मिता आहे, मराठी भाषेचा उगमच या भागातला आहे. हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दुर्दैवाने ती अस्मिता ते चैतन्य आपण विसरलो आहोत. भविष्याकडे पाहताना, नव्या पिढीची काळजी करताना आपली जी मूळ वृत्ती आहे ती आपण सांभाळली पाहीजे. असे माने म्हणाले. विसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे दोनच संत झाले आणि दोन्ही अमरावतीतले होते. त्यांनी आपल्याला सर्वधर्मसमभाव, जातीपातीचा अंत करण्याची शिकवण घालून दिली. त्यासाठी पुन्हा जागरण होण्याची गरज आहे. त्यामध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. (Marathi Journalists Association) माध्यमांची स्थिती आज अत्यंत वाईट आहे. पण प्रत्येकाने आपापल्या परिने योगदान देवून एक-एक मेणबत्ती पेटविली तर सुर्यासारखे तेज झळाळून निघेल. असे श्रीमंत माने म्हणाले.