पुरुष व महिला मँरेथाँन स्पर्धा संपन्न!
हिंगोली (Marathon Competition) : हिंगोली येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या (Dussehra Festival Committee) वतीने १ ऑक्टोंबर हा ऑक्ट बुधवार रोजी सकाळी ७.३० वाजती जि. प शालेच्या मैदानावर खुल्या पुरुष व महिला मँरेथाँन स्पर्धा संपन्न झाल्या.
मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते!
मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (District Collector Rahul Gupta) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रा. बंकट यादव, क्रीडाअधिकारी आत्माराम बोथीकर, दत्तराव बांगर, विशाल शिंदे, सुनिल सुकणे, रामप्रकाश व्यवहारे, शिवाजी इंगोले, सोपान नाईक, सूर्यवंशी, सुधाकर बल्लाळ, सत्यप्रकाश नांदापूरकर वैजनाथ गाडे, गजानन टवले, संजय भूमरे, रतन सपकाळ, दिलप गव्हाणे, रावसाहेब गेंडाफळे, मनोहर डूरे, भागवत इंगोले, रामदास हनुमंते, रवि हानवते, यश गंगावणे, चंद्रभान घ्यार, राम जाधव, अनिल लोळेवार, नितीन भोरे, गजानन आडे, साईनाथ सरकटे, राजेश जगताप, सुधाकर बहादूरे, प्रभाकर काळबांडे, सुधाकर पाईकराव, प्रकाश अडकिणे, नरेंद्र रायलवार, शंकर पोघे, पवन राठोड, पार्थ बांगर, हनुमान बांगर, विजय बांगर, मयुर बांगर, निसार शेख, लक्षण राठोड, ज्ञानोबा मोरतळे, यश थाटे, विवेक जाधव, वैभव घोंगडे धिरज कु-हे, अजय कपाटे, शंकर पोधे आदी उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धा पुरुष खुला गटात 5 कि.मी.धावणे प्रथम ऋषिकेश वावरे (नाशिक),द्वितीय नितीन हिवराळे (अमरावती), तृतीय योगेश पोळे (जालना), महिला खुला गट- 5 कि.मी धावणे प्रथम वैष्णवी वानखेडे (अमरावती), द्वितीय ऋतिका नंदेगर (वाशिम), तृतीय सांजक बनकर (अमरावती) यांचा समावेश आहे. 17 वर्ष वयोगटातील मुले 3 कि.मी. धावणे.प्रथम प्रतिक शेडाम (अमरावत), द्वितीय प्रणव राठोड (पुसद),तृतीय अतूल पवार (जयपूर), 17 वर्षाखालील मुली 3 कि मी. धावणे प्रथम सेजल चौधरी (वर्धा), द्वितीय स्नेहा चौधरी (वाशिम), तृतीय गौरी भोसले (परभणी) यांचा समावेश आहे. या स्पर्धेचे संयोजक अथलेटिक्स संघटनेचे सचिव रमेश गंगावणे हे होते.