मराठवाडा एक्सप्रेस प्रसंगी घडली घटना
सेलू (Selu Railway Station) : शहरातील रेल्वे स्टेशनवर मराठवाडा एक्सप्रेसच्या वेळी शनिवार २७ जुलै रोजी रात्री ८:४५ वाजता एका ५५ वर्षीय रेल्वे प्रवासी यास रेल्वे स्टेशनवर कर्तव्य बजावणाऱ्या आरपीएफच्या राजकुमार मीना आणि जीआरपी चे गायकवाड यांनी १०८ रुग्णवाहिकेतून तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात रात्री ९ वाजता दाखल केले. या जखमी रेल्वे प्रवाशाला मात्र वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्यास जीवदान मिळाले आहे. हा प्रवाशी रेल्वेतून पडला की रेल्वे चढताना अपघात झाला याची माहिती रेल्वे पोलिसांना नसल्याने मिळू शकली नाही.
तात्काळ रुग्णालयात केले दाखल
याबाबतची माहिती याप्रमाणे शनिवार २७ जुलै रोजी रात्री ८:४५वाजता राजाराम सिताराम मोकाटे वय ५५ वर्षै राहणार करडगाव तालुका सेलू हे मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे सेलु स्टेशनवर असताना गंभीर जखमी अवस्थेत रेल्वे स्टेशनवर आढळून आले. याची माहिती रेल्वे स्टेशन वर असलेल्या आरपीएफचे राजकुमार मीना जीआरपी चे गायकवाड यांना कळताच त्यांनी १०८ रुग्णवाहिकेचे डॉ . नयन धरणे,चालक प्रकाश कांगणे, सोमेश पडुळे यांच्या मदतीने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
यामुळे वेळीच उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टाळला. दरम्यान राजाराम मोकाटे हे कसे जखमी झाले हे पोलिसांच्या तपासानंतरच कळेल. दरम्यान राजाराम मोकाटे यांना रात्री दोन वाजता सेलु उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारार्थ परभणी येथे शासकीय रुग्णालयात रात्री तीन वाजता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.