मुख्यमंत्र्यांना दिली आ. संजय गायकवाड यांनी मूळपत्रिका !
शिवछत्रपतींचा स्वाभिमानी बाणा,
शंभूराजामुळे उंचावल्या आमुच्या माना..
शिवस्मारकामुळे वाढली कार्याची उंची,
ताठ झाला कर्तुत्वामुळे विकासाचा कणा !
वडील “संजूभाऊ” अन् आई “पूजाताई”,
बंधू “मृत्युंजय”च्या स्नेहाचा प्रेमळ झरा..
“धर्मवीरा”च्या पैजणाची अंगणी छनछन,
मंगलध्वनीत होणार “पृथ्वीराज”ची “वसुंधरा” !
बुलडाणा (Marriage certificate) : हा ऐतिहासिक आशय घेऊन विकासाच्या वाटेवरून नवदांपत्याची वाटचाल होवो, हा संदर्भ घेऊन धर्मवीर आमदार (Sanjay Gaikwad) संजय गायकवाड यांचे “चि.पृथ्वीराज” याचा ” चि. सौ. का. वसुंधरा” अर्थात राजेश मापारी लोणार यांची सुकन्या हिचेेशी होणाऱ्या विवाहाची लग्नपत्रिका सध्या बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर वाटल्या जात आहे. हीच लग्नपत्रिका घेऊन आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पोहचले ते थेट मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा” या मुंबईस्थित निवासस्थानी. ना. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व आ. संजय गायकवाड यांचे कौटुंबिक स्नेहसंबंध, त्यामुळे गायकवाड परिवाराकडून शिंदे परिवाराला मूळपत्रिका यावेळी देण्यात आले. उपस्थित होते स्वीय सहाय्यक संतोष शिंगणे व निषाद (गोटू) येरमुले.
या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरू
“चि. पृथ्वीराज” आणि ” चि. सौ. का. वसुंधरा” यांचा शुभविवाह बुधवार 29 मे रोजी सायंकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी बुलढाणा येथील एस.टी. वर्कशॉपच्या बाजूला असलेल्या भव्य मैदानावर संपन्न होणार आहे. या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरू असून, निमंत्रण पत्रिकेचे वाटप युद्धस्तरावर सुरू आहे. अनेक मान्यवर नेते, मंत्री, खासदार व आमदार यांच्यासह जिल्ह्यातून संपूर्ण (Buldhana Assembly) बुलढाणा विधानसभा मतदारसंघात पत्रिका पोहचवल्या जात आहे. आज बुधवार 22 मे रोजी मुंबई येथे जाऊन आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना निमंत्रण पत्रिका दिली, या पत्रिकेचा स्वीकार करून लग्नाला येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रायगडावर जाणार पत्रिका घेऊन…
घरी काही कार्य असलंतर, देवाधिकांना मंदिरात जाऊन पत्रिका दिल्या जातात. (Chhatrapati Shivarai) छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत असून, त्यांच्यासाठी पत्रिका घेऊन रायगडावर जाणार असल्याचे (Sanjay Gaikwad) आ. संजय गायकवाड “देशोन्नती”शी बोलताना म्हणाले.