कारंजा/ वाशिम (Woman suicide) : एका 27 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Woman suicide) केल्याची घटना शहरातील जुना बस स्टँड परिसरात 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्यान उघडकिस आली.निकिता धीरज नवघन वय 27 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान राहत्या घरी मृतक महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानंतर मृतदेह (Woman suicide) शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान (Karanja Police) शहर पोलिसांनी या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत .आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.