जिंतूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना…!
परभणी (Married woman suicide) : जिंतूर तालुक्यातील भोसी गावात सोमवारी 7 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. गावातील लक्ष्मी स्वामी माघाडे (वय २२ वर्षे) या तरुण विवाहितेने शेतातील आखाड्याच्या शेजारी असलेल्या झाडाला (Married woman suicide) गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तिच्या पाठीमागे दीड वर्षांचा चिमुकला मुलगा असून या दु:खद घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावातील लोकांनी सकाळी ही दुर्दैवी घटना पाहताच ग्रामस्थांत भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले. लक्ष्मीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, यामागची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. पोलीस याबाबत अधिक तपास करत असून घटनास्थळी बिट जमादार सुभाष चव्हाण, जमादार दत्ता बुधवंत, पो कॉ शिंदे, पोहेकॉ ठाकूर यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दीड वर्षाच्या निरागस मुलाच्या आयुष्यातून आईचे छत्र हरवले आहे. घरच्या मंडळींवर आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. या (Married woman suicide) दु:खद घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
स्त्रीजीवनातील वेदना, प्रश्न अनुत्तरित…
गावकऱ्यांच्या मते, लक्ष्मी मनमिळावू स्वभावाची होती. तिच्या अशा आकस्मिक निधनाने अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजातील महिला व त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत अधिक जागरूकता आणि संवादाची गरज अधोरेखित होते. (Married woman suicide) घटनेचा तपास परभणीतील बामणी पोलीस करीत असून पुढील तपशील लवकरच समोर येणार आहे.




