परभणीतील बोरगव्हाण येथील घटना…!
परभणी (Married Woman suicide) : पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या (Married Woman suicide) प्रकरणी पाथरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी फिर्यादी भगवान साळवे (रा. इटाळी, ता. मानवत) यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी उर्मिला हिला सासरच्या मंडळींकडून वारंवार शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवणे, अपमानास्पद भाषा वापरणे यांसारखा छळ सहन करावा लागत होता. तसेच घरासाठी एक लाख रुपये आणावेत, असा दबावही तिच्यावर टाकण्यात येत होता. या छळास कंटाळून उर्मिलाने रविवार ८ जून रोजी सकाळी ९ वाजता (Married Woman suicide) गळफास घेऊन आयुष्य संपवले.
याप्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी टिपरसे , पोनि महेश लांडगे, पोउपनि कुलकर्णी, पोह सुनिल लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या (Married Woman suicide) प्रकरणाचा तपास पोउपनि कुलकर्णी हे करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची नोंद सपोनि कापुरे यांनी केली. आरोपी अटक नाहीत .




