शेतकरी कर्जात जन्मतो, जगतो, मरतोही कर्जातच;
मासळ (Masal) : आज मानवाने चंद्रापर्यंत झेप मारली. माणूस परग्रहावर राहण्याचे स्वप्न बघतोय. एवढी प्रगती आपल्या विज्ञानाने केली. मात्र, आपला जगाचा पोशिंदा (The World’s Food), आपला शेतकरी आजही आत्महत्या (Suicide) करून आपले जीवन संपवत आहे. जसे आज संपूर्ण जगात कोरोना महामारीने लोक मृत्यूमुखी पडले, जणू काही अशीच महामारी माझ्या शेतकरी (Farmer) राजावर आली आहे. कारण रोज वृतपत्रे उघडले की, या बातम्या वाचायला मिळतात. कधी-कधी तर शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह आपले जीवन संपवितो. त्यात ते कोवळे-कोवळे जीव पण असतात, ज्यांनी हे जग सुद्धा अनुभवले नव्हते. कधी संपणार हे सगळे? कधी संपणार शेतकऱ्यांचा त्रास ? कधी होणार जगाचा पोशिंदा सुजलाम सुफलाम? कधी होणार शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती? आज आमचा शेतकरी कर्जात जन्मतो, जगतो व मरतोही कर्जातच.
शेतमालाला कवडीमोल भाव!
याविषयी कारणमिमांशा व त्यावर उपाययोजना होणे सरकारकडून गरजेचे रोणार कृषी अभियांत्रिक आहे. दरवर्षी आपण दुष्काळाच्या बातम्या बघतो. परंतू माझा शेतकरी, तो दुष्काळ जगतो, कधी अतिवृष्टी तर कथी कोरडा दुष्काळ. आपण बघतो की, हिमालयीन नद्यांना पूर येऊन उत्तरेकडील राज्यात पिकांचे नुकसान (Crop Damage) होते तर आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात पावसाने मारलेल्या दडी, कधी अवकाळी तर अतिवृष्टी, यामुळे दुबार तिवार पेरणीचे संकट निर्माण होते व या सगळ्यात आपला शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतो. एखाद्या वर्षी पाऊस चांगला होतो. पिके सुद्धा चांगली येतात. परंतू परत निसर्गाचा लहरीपणा दिसून येतो व ऐन पीक काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस, गारा पडतात व होत्याचे नव्हते करून जातात. मग अशा वेळेस त्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळतो.
केव्हा कर्जमुक्त होणार?
ज्यात उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. बऱ्याचवेळा शेतकरी आपल्या जमिनी सरकारी वा बॅकींग कर्जासाठी (Banking Loan) किंवा इतर कार्यासाठी विकतात. मात्र त्यातून आलेला पैसा हा सगळा उथळपट्टी करून टाकतात व परत त्याच्याकडे कर्ज काढण्याशिवाय काही पर्याय शिल्लक राहत नाही. सावकारी, बँकींग किंवा इतर मार्गाने शेतकरी कर्ज घेऊन संपूर्णपणे ते कर्ज नापिकी किंवा शेतकऱ्यांप्रति शासनाचे (Government) उदासिन धोरणामुळे वाढतच जाऊन शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडतो. अशावेळेस त्या मानसिकतेतून कदाचित आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे, असे तो समजतो व आपले जीवन संपवतो.
तात्पुरता दिलासा नाही, उपाययोजना हव्या.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासनाने निश्चित असे प्रयत्न नक्कीच केले पाहिजे व शासनाच्या या संपूर्ण प्रयत्नात आपण समाज म्हणून आपली जबाबदारी निश्चित ओळखून हातभार लावला पाहिजे. प्रत्येकवेळी शेतकरी समस्या सोडविण्यासाठी कर्जमाफीचा पर्याय वापरला जातो, निश्चितच त्यामुळे शेतकऱ्यांचा ताण कमी होतो. मात्र, हा काही शाश्वत उपाय नाही. कारण हा एक तात्पुरता दिलासा आहे. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच आपल्या जमिनींना योग्य पीकपद्धती कोणती? आपल्या जमिनीचा पोत काय? निसर्गाचा अनियमितता व त्यासाठी करावयाच्या उपाययोजना, सिंचन सुविधा (Irrigation Facilities) वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. तसेच आपण समाज म्हणून जमिनीची खालावलेली पातळी वाढवण्यासाठी’ पाणी अडवा, पाणी जिरवा’ सारख्या गोष्टीकडे जागरूक असले पाहिजे.