हिंगोली(Hingoli):- येथे मुस्लिम इत्तेहात समिती तर्फे शेख निहाल भैय्या यांनी 2 ऑक्टोबर रोजी मेराजुलूम येथे मस्जिद आणि मदरसा परिचय मानवतेचा संदेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सर्व पक्षातील नेते मंडळी दिलीप चव्हाण, अनिल पतंगे,विनायकराव भिसे पाटील,बी.डी बांगर, मुनीर पटेल, रमेश शिंदे, प्रकाश थोरात,संजय दराडे, अनिल नैनवाणी,डॉक्टर विठ्ठल रोडगे,डॉ.अमोल धुमाळ, डॉक्टर नितीन अग्रवाल,भूषण देशमुख,अँड.बंटी देशमुख,मुन्ना यादव, कमलेश यादव,हाजी ताहेर कुरेशी, हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर,शेख शकील, सनाउल्लाह खान वसीम, हकीम बागवान, शेख वाजीद खुर्षीद, राशीद तामबोळी, इरफान पठाण,जुबेर मामू, इतर पोलीस अधिकारी तसेच महसूल कर्मचारी सामाजिक,राजकीय, वकील,डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, तलाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नागरिक मोठ्या संख्येने सहभागी
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज व खारी अर्षद फलाही यांच्या कुराण पठणाने झाली आणि त्यांनी त्याचा मराठी अनुवाद सुद्धा सादर केला. निहाल भैय्या यांनी कार्यक्रमाचा(Program) उद्देश स्पष्ट केला. आणि म्हटले की आज विविध जाती-धर्मात समाज बांधवन मध्ये अनेक गैरसमज पसरवल्या जात आहेत.त्याच निराकरण करण्याची गरज आहे पैगंबर हजरत मोहम्मद(स.स ) यांनी शांती, प्रेम, सदभावना, करुणा, समता,समानता बंधुत्व चा संदेश दिला आहे. नंतर हाफिज जुबेर यांनी माहिर अल-कादरी यांच्या सलामचे सुंदर शैलीत सादर केले. नंतर मुफ्ती शफीक खान रहमानी यांनी मदरशाची संपूर्ण आणि सविस्तर ओळख करून दिली आणि हाफिज, आलीम, मुफ्ती आणि काझी या अरबी सज्ञा स्पष्ट केल्या. तसेच मदरशाच्या अभ्यासक्रमात कोणत्या क्रमाने शिकवले जाते. त्याच्या सविस्तर उहापोह केला व आज समाज माध्यमांद्वारे ज्याप्रमाणे इस्लाम (Islam) विषयी जाणीवपूर्वक द्वेष पसरविण्यात येत आहे त्यांना दूर करण्याचे कार्य करावे लागणार आहे. तदनंतर प्रा.मोहम्मद इक्बाल जावेद यांनी वजु, अजान, नमाज आणि मशिदीची ओळख करून देताना अजान आणि नमाजचा अर्थ मराठी भाषेत सांगितला. तसेच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की भारत हा विविध जाती धर्माचा देश आहे.
येथे सांप्रदायिक सदभावना जातीय सलोखा जोपासण्यासाठी व्हॉट्सॲप(Whatsapp), फेसबुक(Facebook) वरील बातम्यांना प्रधान न देता एक दुसऱ्याच्या धर्माचे खरी महिती घेण्याची गरज आहे. देशात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.मुहम्मद इकबाल जावेद यांनी केले. मराठी भाषेतील कुराणांच्या पवित्र ग्रंथाचे पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. स्टॉलचे संचलन अब्दुल रहीम ,सय्यद जमील,शेख अफ्रोझ शे.एजाज, संतोष साबळे, शेख अतीक,आदील पठाण आणि मकीन पठाण यांनी केले.यावेळी देश बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.