मुस्लीम समाजाच्या सामुहिक सोहळ्यात 40 जोडपे विवाहबध्द
परभणी (Muslim Samaj Marriage) : शहरातील रोशन खाँ मोहल्ला परिसरात तखीयार नगरीत बारादरी या ठिकाणी सामुहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात ४० जोडपी विवाहबध्द झाली. सोमवार १६ सप्टेबर रोजी ईद ए मिलादनिमित्त आयोजित या (Muslim Samaj Marriage) सामुहिक विवाह सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून खा. संजय जाधव, आ.डॉ. राहूल पाटील, माजी खा. गणेश दुधगावकर, डॉ. विवेक नावंदर, अरविंद देशमुख, सतीश चकोर, भगवानराव वाघमारे, इरफान उर रहेमान, शेख इब्राहिम, मुस्लीम धर्मगुरुंची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदरील विवाह सोहळ्यात ४० जोडप्यांचे निकाह लावण्यात आले. नवदांपत्यास कमिटीकडून संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.
सदरील (Muslim Samaj Marriage) विवाह सोहळ्याचे कौतूक खासदार, आमदार यांनी केले. व पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त लग्न लावणार असल्याची माहिती कमिटीकडून देण्यात आली. सदरील विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रो. सय्यद हामेद हाश्मी, अब्दुल हफिज, अन्वर खान, मौलाना रफियोद्दिन आश्रफी, तैजीब खान, शेख शेरु, मोहम्मद ताहेर अली खान, मोहम्मद रफिक, मोहम्मद नियाजोद्दिन फारुखी, आशरफ सेठ साया, जावेद खान, सिकंदर कोठारी, अब्दुल रज्जाक कोठरी, खलील देशमुख, शाहेद अन्सारी, मिनाज पटेल, शरीफ गुत्तेदार, अजीस खान, शोएब सर, सय्यद रफिक, अहेमद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर (Muslim Samaj Marriage) विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला.