मानोरा(Washim):- बहुचर्चित जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड ४४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मास्टर माईंड (Master Mind) प्रणित मोरे व त्याचा भाऊ प्रितम मोरे यांना न्यायालयात दि. १५ जानेवारी रोजी पोलीसांनी हजर केले असता न्यायाधीशांनी (judges) १० दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका आरोपींची दवाखान्यात तर महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
अधिक माहिती अशी की, जन संघर्ष अर्बन निधी ली. चे मुख्य सुत्रधार आरोपी (accused) प्रणित मोरे यांनी यवतमाळ जिल्हयात पाच व वाशीम जिल्हयात असे एकूण सात शाखा सन २०२१ मध्ये सुरू केल्या होत्या. ठेवीदार व खातेदार यांना १२ टक्के आमिष दाखवून सात शाखेतून ६२०० ठेवीदार व खातेदारांच्या ४४ कोटी रुपयाचा अपहार करून फरार होण्यात यश मिळविले होते. या घोटाळा प्रकरणातील ७ पैकी ३ संचालकांना पोलीसांनी नागपूर वरून पहिलेच अटक केली होती. तर मास्टर माईंड प्रणित मोरेसह त्याच्या कुटुंबातील देवानंद मोरे, जयश्री देवानंद मोरे व प्रितम मोरे तीन आरोपींना पोलीसांनी तब्बल ३६ दिवसानंतर पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील आलिशान विला येथून मंगळवारी अटक करून ताब्यात घेतले.
दुसऱ्या दिवशी पोलीसांनी दिग्रस येथील ठाण्यात हजर करून दारव्हा येथील न्यायालयात उभे केले असता यातील आरोपी दोघा भावांना न्यायाधीशांनी पोलीस कोठडी सुनावली, तर देवानंद मोरे यांना रुग्णालयात दाखल केले तर जयश्री मोरे हीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.