हिंगोली (Ex-MLA Goregaonkar) : राज्यात महाविकास आघाडी कायम असली तरी हिंगोलीत मात्र आघाडीत मोठी बिघाडी झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर (Ex-MLA Goregaonkar) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी चालविली आहे. याचा फटका महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठाच्या उमेदवाराला बसेल असा अंदाज आहे.
महाविकास आघाडीतील जागा वाटपांतर्गत हिंगोलीची जागा काँग्रेसकडेच राहील, अशी चर्चा असल्याने काँग्रेसमध्ये अनेक जणांनी उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड सुरू केली होती. मुळातच हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. या गटबाजीमुळेच पक्षश्रेष्ठींनी नांदेडची जागा घेऊन हिंगोलीची जागा शिवसेनेला देऊ केली. याचे पडसाद हिंगोलीत मात्र चांगलेच उमटले. शिवसेनेच्या रूपाली पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी जाहीर होताच अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (Ex-MLA Goregaonkar) भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
गोरेगावकरांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली. ही मागणी मान्य करून भाऊराव पाटील गोरेगावकर (Ex-MLA Goregaonkar) यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची शनिवारी घोषणा केली. दोन गोरेगावकरांच्या राजकीय विरोधात यापूर्वी अनेक वेळा भाजपचे फावले आहे. या निवडणुकीतही तीच परिस्थिती उद्भवण्याची वेळ आली आहे.
मीच निष्ठावंत
सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले सर्वच नेते पक्ष बदलून इकडून तिकडे गेलेले आहेत. मी एकमेव उमेदवार आहे जो पक्षाला सुरूवातीपासून निष्ठावंत आहे असे (Ex-MLA Goregaonkar) गोरेगावकर म्हणाले. त्यांचा इशारा सध्याचे महायुतीच्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे होता.
हेच का फळ मम् तपाचे…?
१९९९ मध्ये काँग्रेस फुटली व तथाकथित मोठे नेते राष्ट्रवादीत गेले. पक्षाच्या पडतीच्या काळात मी निष्ठावंत राहिलो, जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे खोलवर रूजविली, त्या काळात जिल्हाध्यक्ष करण्यासाठी पक्षाकडे नेता नव्हता म्हणून बंधू सुनील पाटील यांना अध्यक्ष केले. निष्ठेने केलेल्या या सर्व कामांची पावती पक्षाने जागा सोडून दिल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातरच आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सांगितले.
आपण तिसर्यांदा निवडून आलो त्यावेळी ५९ हजार मते मिळाली होती, त्यानंतर पडलो त्यावेळी ७४ हजार मते घेतली होती. यावरून मतदार संघातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास दिसून येतो असेही ते म्हणाले. जिल्ह्यात आघाडीतील तीन पक्षांसाठी तीन मतदार संघ असताना काँग्रेसकडे असलेला मतदार संघही शिवसेनेला दिल्याने जिल्हाभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर नाराज असल्याचे माजी आमदार गोरेगावकर (Ex-MLA Goregaonkar) यांनी सांगितले.