हिंगोली (Medical Checkup Camp) : जिल्हा प्रशासनाकडून महसूल पंधरवाडानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, शुक्रवार, (दि.१०) रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय तपासणी शिबिराचे (Medical Checkup Camp) आयोजन करण्यात आले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गणेश महाडीक यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्रक्र१३६/ई-१ दिनांक ३० जुलै २०२४ नुसार महसूल विभागामार्फत राज्यात १ ते १५ऑगस्ट हा पंधरवाडा ‘महसूल दिन’ व ‘महसूल पंधरवाडा’ साजरा करण्यात येत आहे त्यानुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कक्ष यांनी १० ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजीत केला आहे.
वैद्यकीय तपासणी शिबिराच्या (Medical Checkup Camp) माध्यमातून नेत्ररोग तपासणी, स्त्री रोग व सर्जरी तपासणी, कान, नाक, घसा, रक्त व लघवी तपासणी, दंतरोग तपासणी तंबाखूमुक्तीविषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विधवा, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांनी या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ महसूल पंधरवाड्यात आरोग्य तपासणी शिबीराचा लाभा घेण्यासाठी व कोणतीही कोणत्याही प्रमाणपत्र वगैरे मिळण्यासाठी अडीअडचणी असल्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विधवा, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.