मानोरा (Manora Bogus doctor) : तालुक्यातील अनेक गावात विना पदवी असलेल्या (Bogus doctor) डॉक्टरांनी ग्रामीण भागात आपले दवाखाने थाटले असुन गावातील नागारीकांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत कोणत्याही प्रकारचे (manora Hospital) वैद्यकीय शिक्षण न घेता ग्रामीण भागातील रूग्णावर मोठया प्रमाणात उपचार करणे जोरात सुरु आहे . यात अनेक रुग्णाचा मुत्यु सुध्दा झाला आहे. तेंव्हा याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे जाणीव पुर्ण दुर्लक्ष तर नाही, अशी चर्चा सुज्ञ नागरीकामधून होत आहे.
मानोरा तालुका हा डोंगराळ भागात वसला असुन तालुक्यात ११३ गावे आहेत. तालुक्यात ३ आरोग्य वर्धीनी केद्र आहे, तर २३ आरोग्य उपकेद्र आहेत . या उपकेद्राला चार ते पाच गावे जोडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एखादा व्यक्ती आजारी पडला तर गावात आरोग्य उपकेद्र वा डॉक्टर नसल्यामुळे गावातील रुग्ण नाईलाजास्तव औषघी व इंजेक्शनची बॅग घेवून फिरणाऱ्या कोणतेही (manora Hospital) वैद्यकीय शिक्षण घेतले नसलेल्या स्वंय घोषीत डॉक्टराकडे हा रुग्ण उपचार घेण्यासाठी सरसावतो. या अशिक्षित असलेल्या रुग्णाचा गैरफायदा घेत बोगस डॉक्टर त्याला वेदना शामक वा तापीचे एखादे इंजेक्शन टोचून स्वतः जवळील औषधी देत त्यावर उपचार करतो. असे (Bogus doctor) मुन्नाभाई डॉक्टर पअनेक गावात असुन रुग्णावर जिवघेणा उपचार सुरु करताना दिसत आहे. चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे गावातील अनेकांनी आपला मुत्यु ओढवुन घेतला आहे, मात्र अशा बोगस डॉक्टरावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. कारण येणाऱ्या काळात पावसाळामध्ये डायरीयाचे रुग्ण जादा असतात तेंव्हा गाढ झोपेत असलेले तालुका आरोग्य अधिकारी वा तालुका सनियंत्रण समीती याची दखल घेताना दिसत नाही. मागील कीत्येक वर्षापासुन तालुक्यातील एकाही बोगस डॉक्टरा विरुध्द कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शंकेला वाव असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील शेंदूरजना, कुपटा व पोहरादेवी या आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मॅडम ३० जून रोजी भेट देवून पाहणी करणार आहेत. यावेळी (Bogus doctor) मुन्नाभाई बोगस डॉक्टर बाबत माहिती व चौकशी करून आदेश कार्यवाही करण्याचे आदेश देण्याची मागणी जोर धरत आहे.