कोट्यवधीच्या प्रापर्टी मालकाचा हॉटेलमध्ये झाला संशयास्पद मृत्यू
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Medical employee Death) : गोंदिया येथील कोट्यवधीच्या प्रापर्टी असलेलया मालकाचा नागपूरातील एका हॉटेलच्या खोलीत संशयास्पद स्थितीत मृतदेह (Medical employee Death) आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत राजधअनी हॉटेलमध्ये ५ सप्टेंबरला उघडकीस आली.
मेडिकलमध्ये फार्मसिस्ट म्हणून होते कार्यरत
अक्षय भैयाभाऊ बाहेकर (५१), मुळ रा. चुटीया, ता. जि. गोंदिया असे मृतकाचे नाव आहे. अक्षय हे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये फार्मासिस्ट म्हणून गेलया तीन चार महिन्यापासून कार्यरत होते. यापूर्वी ते गोंदीया येथे कार्यरत होते. येथून त्यांची तीन चार महिन्यापूर्वी नागपूरातील मेडिकल कॉलेजला बदली झाली होती. प्राप्त माहितीनुसार, अक्षय हे गणेशपेठ हद्दीतील राजधानी हॉटेलमध्ये ३ नोव्हेंबरपासून ३०२ क्रमांकाच्या खोलीत मुक्कामास होते. या खोलीत ते ५ सप्टेंबरपर्यंत होते. हॉटेलला मुक्काम ठोकलयापासून त्यांनी कुठलाही ऑडर दिला नव्हता. शिवाय, खोली बंदच दिसून येत असल्यामुळे कर्मचा-याने मास्टर चाविने रूमचा दरवाजा उघडला.
यावेळी अक्षय हे बेशुध्द अवस्थेत दिसून आले. त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अक्षय हे अविवाहित असून त्यांच्याकडे गोंदीया आणि नागपूर अशा दोन्ही जागी कोट्यवधीची संपत्ती असलयाचे बोलले जाते. त्यात ते शेयर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवायचे. असेही सांगितल्या जाते. याप्रकरणी फिर्यादी राजेश्वर भुतेश्वर तालेवार (५४), रा. मेघराज चाळ, सदर यांनी दिलेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिस ठण्याचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम सोनवने यांनी (Medical employee Death) अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरु आहे.