अर्जुनी मोर (Assembly elections) : महाराष्ट्र नवनिर्वाचन पक्षा आढावा बैठक ला जि.प. विश्रामगृह नवेगाव बांध येथे संपन्न झाली. या सभेला (MNS Meeting) महाराष्ट्र नवनिर्वाचन सेना पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष मनिष चौरागडे यांचे अध्यक्षतेखाली हेमंत लिल्हारे, जिल्हा संघटक रितेश गर्ग,अर्जुनी मोर तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष टुनेशकुमार तरजुले, सतीश कोसरकर तालुका उपाध्यक्ष विकास सिंह अरोरा, जगदीश बडोले,राहुल रोकडे, नितीन लोंढे ,योगेश कापगते, रामलाल घटत ,अकीत शहारे, प्रशिक शहारे ,इ.कार्यकर्तेसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकाबाबत (Assembly elections) चर्चा करण्यात आली तर येत्या 4 आगस्ट 2024 ला कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव बांधयेथे महाराष्ट्र नवनिर्वाचन सेना पक्ष राज्य समितीचे पदाधिकारी, गोंदिया जिल्हा समिती अध्यक्ष व पदाधिकारी अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष पदाधिकारी नवनिर्वाचित सेना या सर्व कार्यकर्त्यांची पक्षांच्या वतीने आढाव बैठक ठेवलेली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका अर्जुनी मोर विधानसभाक्षेत्रासाठी नवनिर्वाचित सेना पक्षाकडून उमेदवार उभे करण्याबाबत सविस्तर चर्चा बैठकीचे आयोजित केले आहे. या बैठकीला गोंदिया जिल्ह्यातील तसेच अर्जुनी मोर तालुक्यातील (MNS Meeting) महाराष्ट्र नवनिर्वाचन सेना पक्षातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन टुनेशकुमार तरजुले यांनी केले.