हिंगोली / हट्टा (Bachu Kadu) : माजी मंत्री बच्चू कडू हे आज १३ सप्टेंबरला हिंगोली जिल्ह्यात येणार आहेत. या निमित्ताने सेनगाव तालुक्यातील सवना, वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ, हट्टा येथे जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी ते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
वसमत तालुक्यातील हट्टा येथे कष्टकरी व शेतकर्यांचे कैवारी, शेतकरी नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) यांची हट्टा येथे आज १३ सप्टेंबर रोजी बाजार चौक, हट्टा सायंकाळी ८ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत शेतकर्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजेत यासह इतर मागण्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे एल्गार तोफ धडाडणार आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) यांचे आज १३ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी सेनगाव तालुक्यातील सवना येथे श्री संत बैरागी महाराज संस्थान सभा मंडपात दुपारी १ ते ३ दरम्यान शेतकरी हक्क परिषद सभा घेण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते ४ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासोबत भेट व चर्चा केली जाणार आहे. दुपारी ४ ते ६ दरम्यान हिंगोली शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालया समोरील दिव्यांग पुर्नवसन केंद्रात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हट्टा येथे रात्री ८ ते १० दरम्यान बाजार चौकात शेतकरी हक्क परिषद सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बल्लू जवंजाळ, नितीन टाकणखेडे, माजी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांच्यासह अनेकांचे या जाहीर सभेला उपस्थिती राहणार आहे. दरम्यान शेतकर्याचा सातबारा कोरा करणार्या सरकारने दिलेले शब्द अपूर्ण या सरकारला जागा करण्यासाठी तसेच कष्टकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांग यासह इतर गरजवंतांना न्याय हक्कासाठी या हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
वाई येथेही आज बच्चू कडू यांची सभा
वसमत : तालुक्यातील वाई गोरक्षनाथ मंदिरात शनिवारी सायं. ६ ते ७ दरम्यान शेतकरी नेते बच्चू कडू यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या शेतमजुरांच्या ,वंचित, अपंगांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकरी, शेतमजूर, शेतकरी शेतमजूर , दिव्यांग, वंचित निराधार, महिला, संघटित असंघटित कामगार, छोटे मोठे व्यवसायीक, ऊस कापूस सोयाबिन उत्पादक शेतकरी, यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शेतकर्यांचा सात बारा कोरा कोरा कोरा करु, असे म्हणणार्या व शेतकर्यांच्या मालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी ही सभा घेतली जाणार आहे.
