परभणी (Meghna Bordikar) : जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्यानंतर आ. मेघना बोर्डीकर – साकोरे यांनाच पालकमंत्री करावे, अशी मागणी भाजप पक्षामधून व मित्रपक्षांकडून करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन परभणीच्या पालकमंत्री पदाची घोषणा झाली असून मंत्री आ. बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचे नाव जाहीर झाले आहे. पालकमंत्री पहिल्यांदाच परभणीचा झाला असल्यामुळे जिल्हाभरात आनंद साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विकासाचा बॅकलॉक भरुन काढण्यासाठी याचा फायदा नक्कीच होणार आहे.