ठाणेदार अजिनाथ मोरे यांचे कोपरगाव, कर्जतला तपासकामी गेलेले गेलेले पथक परतले
बुलढाणा (Mehkar Murder Case) : मेहकर तालुक्यातील बहुचर्चित जानेफळ येथील पैशाचा पाऊस पाडणा-या टोळीतील (Dilip Ingle) दिलीप भिकाजी इंगळे या युवकाच्या खुन प्रकरणी (Mehkar Murder Case) मोबाईल फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन टीमने गुन्ह्यात वापरलेल्या ट्रिबर गाडीतील रक्ताचे नमुने १३ जुलै रोजी घेतले असल्याची माहिती फॉरेन्सिक टीमचे ए.पी.आय रामेश्वर गाढवे बुलढाणा यांनी देशोन्नतीशी बोलतांना दिली आहे.
दिलीप इंगळेच्या (Dilip Ingle) खुन प्रकरणात जानेफळ पोलीसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे तर जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे व त्यांचे पथक तपासकामी व इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी १३ जुलै रोजी सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तसेच कर्जत येथे रवाना झाले होते ते परतले असून त्यांनी खून प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे जमा केले असलयाची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या (Mehkar Murder Case) खुन प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर प्रदीप पाटील, ठाणेदार अजिनाथ मोरे हे करीत आहेत.
आरोपींनी मृतदेह दोन दिवस ठेवला गाडीत
पैशाचा पाऊस पाडणा-या टोळीतील दिलीप इंगळे याला गंभीर मारहाण केल्यानंतर आरोपींनी ट्रिबर वाहनात (Dilip Ingle) दिलीप इंगळेचा मृतदेह दोन दिवस ठेवला होता तदनंतर मृतदेह कर्जत नजीक फेकून दिला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.