जाणून घ्या…त्याच्यावर कोणते आरोप आणि खटले?
मुंबई (Mehul Choksi Arrested) : PNB कर्ज घोटाळ्यातील (PNB Scams) आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियमने चोक्सीविरुद्ध कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सी (Mehul Choksi) बेल्जियममधील अँटवर्पमध्ये त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत होता. मेहुलची पत्नी प्रीती चोक्सी ही बेल्जियमची नागरिक आहे.
Fugitive Mehul Choksi has been arrested in Belgium: ED Sources
More details awaited pic.twitter.com/SN8e0beAMu
— ANI (@ANI) April 14, 2025
मेहुल चौकसीवर कोणते आरोप?
फरार मेहुल चोक्सीवर (Mehul Choksi) अनेक गंभीर आरोप आणि खटले दाखल आहेत. तो पंजाब नॅशनल बँक (PNB Scams) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. हे प्रकरण 2018 मध्ये उघडकीस आले आणि त्यात 13,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाला आहे. मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी (Nirav Modi) यांच्यावर पीएनबीला 13,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
#WATCH | On fugitive Mehul Choksi's arrest in Belgium, Punjab National Bank Scam whistle-blower Hariprasad SV says, "Extradition is not going to be an easy task. His wallet is full, and he will employ the best advocates in Europe, as Vijay Mallya has been doing. It is not easy… pic.twitter.com/Gz6HQCL79i
— ANI (@ANI) April 14, 2025
चोक्सीच्या कंपन्या – गीतांजली जेम्स लिमिटेड, नक्षत्र ब्रँड्स लिमिटेड आणि गिली इंडिया लिमिटेड – या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सहभागी आहेत. मेहुल चोक्सीवर (Mehul Choksi) बनावट हिरे खरे असल्याचे सांगून, त्यांची विक्री करण्याचे रॅकेट चालवल्याचा आरोप आहे.
#WATCH | Delhi: On fugitive Mehul Choksi's arrest in Belgium, Businessman Robert Vadra says, "It is a very big thing for the country. Arresting is a different thing, but it is important that the money of the people who have been cheated should be recovered, and the government… pic.twitter.com/fndALq0u0l
— ANI (@ANI) April 14, 2025
ऑक्टोबर 2022 मध्ये, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने (Board of India) चोक्सीला (Mehul Choksi) भांडवली बाजारातून 10 वर्षांसाठी बंदी घातली आणि 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. (Gitanjali Gems Limited) गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये फसवणूक आणि अनुचित व्यापार पद्धतींचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. तो 2018 पासून अँटिग्वा आणि बारबुडामध्ये राहत होता आणि त्याने येथील नागरिकत्व देखील घेतले होते.