१० कोटीचे काम साडे४ कोटीत; स्वखर्चाने व स्वतःचीच माणसे पाठवून!
बुलढाणा (Ratan Tata) : भारतीय उद्योग क्षेत्रातील तारा निखळला, रतनजी टाटा नावाची व्यक्तिमत्व अंतर्धान पावले. याच टाटांच्या आठवणी कार्याच्या माध्यमातून बुलढाण्याच्या स्त्री रुग्णालयात अर्थात तेव्हाच्या कोविड रुग्णालयात ताज्याच आहेत. जगभर कोरोना धुमाकूळ घालत असताना, आरोग्य सेवेसाठी जी काही सरकारी रुग्णालय टाटांच्या माध्यमातून अध्ययावत करण्यात आली होती.. त्यात बुलढाण्याचे कोविड रुग्णालय (Buldhana Hospital) होते. ज्या विविध कामासाठी शासनाचे 10 कोटी रुपये खर्च करूनही ते काम बोगस झाले असते, ते काम फक्त साडेचार कोटी रुपयात तेही स्वखर्चाने व स्वतःची माणसे पाठवून अगदी अत्याधुनिक पद्धतीने हाय क्वालिटी मटेरियल वापरून टाटांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे कोविड काळात बुलढाण्याचे रुग्णालय देऊन गेले होते, अनेकांना जीवदान!
रतनजी टाटा (Ratan Tata) यांनी बुलढाण्याचे कोविड रुग्णालयाचे काम त्यांच्या यंत्रणेमार्फत करून घेतले. दोन इंजिनिअरसह 50 कामगार 24 मार्च ते 10 ऑगस्ट 2020 पर्यंत बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये राहून अहोरात्र कोविड रुग्णालयाचे काम कोरोना काळातही करत होते. विशेष म्हणजे येणाऱ्या मटेरियलसाठी फक्त पास मिळवण्याकरीता त्यांनी प्रशासनाचे सहकार्य घेतले, एवढे बघायचं त्यांनी एक कप चहा सुद्धा कोणाचा पिला नाही.
रतन टाटा (Ratan Tata) यांच्या माध्यमातून बुलढाण्याच्या कोविड तर रुग्णालयात (Buldhana Hospital) ऑक्सिजन सेंटर पाईप लाईन टाकून संक्शन यंत्रणा उभारण्यात आली. हाय कॉलिटीचे 100 अद्ययावत बेड रुग्णांसाठी, संपूर्ण रुग्णालयात 78 एअर कंडिशन, प्रत्येक वार्डमध्ये कपाट, स्टाफसाठी अत्याधुनिक रूम त्यात एसी, फ्रिज, सोफासेट, कॉफी टेबल, पर्सनल रूम, शोभेच्या वस्तू टाटा यांच्याकडूनच उपलब्ध करून देण्यात आल्या तरी त्याशिवाय डॉक्टरांसाठी सहा रूम, त्या रूममध्ये फ्रिज, कुलर व हाय क्वालिटीज पडदे, तत्कालीन व्यवस्थेत कपडे बदलण्यासाठीची खास व्यवस्थाही (Ratan Tata) टाटांच्या यंत्रणेने तयार करून दिली. डॉक्टरांसाठी पब्लिक अटॅच सिस्टीम ही अत्याधुनिक सुविधाही त्याच यंत्रणेने या रुग्णालयात उपलब्ध करून दिली. याशिवाय दवाखान्यातील मायनर चेंजेसही त्यांनी करून दिले. त्या कामावर तत्कालीन कोविड रुग्णालयात काम करणारे प्रमुख डॉक्टर भागवत भुसारी व सचिन वासेकर यांनी विशेष लक्ष ठेवले होते. उल्लेखनीय म्हणजे चार महिन्यात टाटांच्या यंत्रणेने हे काम कोरोना काळातही अहोरात्र केले, त्यानंतर या अत्याधुनिक कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते झाले होते.
कोविड काळात रुग्णालयासाठी केवळ पैसे देऊन रतन टाटा मोकळे झाले नाही, तर दिलेल्या पैशातून त्यांनी हाय क्वालिटीचे काम करूनही दिले.. की जे काम करण्याकरता शासकीय यंत्रणेला 10 कोटीच्यावर खर्च आला असता, तेच काम रतन टाटांनी (Ratan Tata) बुलढाण्याच्या कोविड व आताच्या स्त्री रुग्णालयात साडेचार लाख रुपयात अत्याधुनिक पद्धतीने करून दिले. त्यामुळे रतन टाटा गेले तरी (Buldhana Hospital) बुलढाण्याच्या ‘त्या’ रुग्णालयात त्यांच्या ‘त्या’ आठवणी अजूनही कायम आहेत !