शेतकर्यांच्या जीवाशी मांडीयेला खेळ इ कृषी व पोलिस विभागापुढे कारवाईचे आव्हान
यवतमाळ (Bogus Seeds) : खरीप व रबी हंगामात निसर्गाने दगा दिल्यामुळे उत्पादन ढासळलेल्या बळीराजावर पुन्हा मोठे संकट निर्माण झाले आहे. जीव मुठीत धरून जगणार्या शेतकर्यांच्या जीवाशी बोगस बियाणे तस्करांनी खेळ सुरू केला आहे. जिल्ह्यात (Bogus Seeds) बोगस बियाण्यासह बोगस खतांचा धोका बळावला आहे. बोगस बियाणे विक्री करणार्या टोळीचा शिरकाव झाला असून बियाण्यांचा हा काळाबाजार शेतकर्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे. अलीकडे आता बोगस बियाण्यांच्या साखळीतील तस्करांनी कृषी व पोलीस यंत्रणेसमोर आव्हान ठाकले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जवळपास ९० टक्के वर्ग शेतकर्यांचा आहे. नव्हेतर पांढर्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ख्याती आहे ज्या प्रकारे जिल्ह्यात शेतकरी वर्गांची संख्या आहे. त्याचप्रकारे शेतकरी आत्महत्येच्या बाबतीतही जिल्हा अव्वल असल्याचे राज्यस्तरीय अहवालावरून समोर आले आहे. नव्हेतर शासनदरबारी याची नोंददेखील आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Bogus Seeds) खरिपासह रब्बी हंगामातील शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने लावलेला खर्चदेखील बहुतांश शेतकर्यांच्या पदरी पडला नाही.
अशातच सध्याघडीला पुन्हा खरिपाची तयारी करत असताना या संकटाच्या काळात जिल्ह्यात आता बोगस, अप्रमाणित (Bogus Seeds) बियाण्यांसह खतांचा धोका बळावला आहे. यामुळे शेतकरी वर्गांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. तीन वर्षांपूर्वी दारव्हा तालुक्यात एका बड्या तस्कराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून लाखोंचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले होते शिवाय गेल्या वर्षी पोलीस व कृषी यंत्रणेने संयुक्तिक कारवाया करीत ७ पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साठा जप्त केलेला. अशातच यंदाही पुन्हा आता जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार सुरू झाला आहे.
गेल्या वर्षी काही तालुक्यांमध्ये कारवाया झाल्या.मात्र (Bogus Seeds) बोगस बियाणे विक्री मात्र थांबली नाही.त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी विशेष पथकांचे गठन केले आहे.त्यामुळे बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध लावणाचे आव्हान पथकांपुढे उभे आहे.एकूणच आता कृषी विभाग नेमका काय पावित्रा घेतात याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.