हिंगोली (Hingoli Railway Police) : रेल्वेद्वारे ओडिसा राज्यातून प्रवास करीत (Hingoli Railway Police) हिंगोली रेल्वे स्टेशनवर पोहोचलेले एका मतिमंद युवकाला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास रेल्वे स्टेशन वरील आर पी एफ पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावण्याचे दिसून येते.
आज पण जगात चांगली कामगिरी व कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी किंवा (Hingoli Railway Police) रेल्वे पोलीस असतात याचे एक ताजे उदाहरण म्हणजे 1 ऑक्टोंबर रोजी साधारणता 19 वर्षे वयाचा एक मुलगा फिरताना कर्तव्यावर आरपिएफ सी.सी.खंदारे यांना दिसून आला त्यावेळेस त्यांनी चौकशी केली असता तो युवक ओडीसा राज्यातील भद्रक व त्याचे नाव सुलेमान अहमद असे सांगू लागला परंतु त्याला त्याच्या कुटुंबाविषयी माहिती सांगता येत नसल्यामुळे व रेल्वे पोलिसांनी व खंदारे यांनी चाईल्ड हेल्पलाइन संपर्क साधून त्याची तपासणी केली असता सदरील मुलाचे वय 19 वर्षे असल्याचे सिद्ध होऊन आले त्यामुळे त्यांनी पुन्हा रेल्वे पोलिसांना त्या युवकाला स्वाध्याय केले.
त्यानंतर पूर्ण येथील आरसीएफ रमन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली शेख सुलेमान यास (Hingoli Railway Police) हिंगोली रेल्वे पोलीस स्टेशनला ठेवून त्या मुलांची काळजी घेऊन त्याला जेवण वगैरे सर्व सुविधा देऊन सर्व तपास काढून ओडिसा या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाला संपर्क साधला असता त्याच्या नातेवाईकांनी हिंगोली गाठून या मुलांना आपल्या ताब्यात घेतले त्याची ओळख पटल्यानंतर त्याच कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आपला हरवलेला मुलगा पाहून आई-मुर्शिदा बेगम वडिल शेख शरीफ व भाऊ यांनी हंबरडा फोडून रेल्वे पोलिसाची धन्यवाद मानले कामगिरी रेल्वे पोलीस सीसी खंदारे, अंकुश बांगर विश्वंभर शिंदे मोतीराम काळे (Hingoli Railway Police) हिंगोली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर पप्पू कुमार व अन्य कर्मचाऱ्यांनी पार पाडले याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस आपले कर्तव्य अशा प्रकारे बजवत असल्याने सर्वसामान्य जनतेतून भीतीचे वातावरण दूर होत आहे.