व्यापारीवर्गात भितीचे वातावरण
वाशिम (Washim Crime): लोकसभा निवडणुकीचे निकालानंतर काही जातीयवादी (Racist) युवक शहरात धुमाकूळ घालून आपली दहशत निर्माण करत आहेत. अशातच ७ जून रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास काही युवकांनी येथील पाटणी चौकात एका व्यापार्यासह त्यांच्या दुकानात काम करणार्या नोकरास बेदम मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत शहर पोलीस स्टेशनला (City Police Station) दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार येथील व्यवसायिक (Professional) मयुर रमेश चुंबळकर (वय ३३) रा. टिळक चौक वाशिम (Washim) यांनी शहर पोस्टेला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, ७ जून रोजी रात्री अंदाजे ११.३० वाजता दरम्यान मी व माझ्या दुकानातील नोकर कृष्णा पवार व गजेंद्र यादव हे दुकान बंद करुन घराकडे जात असतांना अचानक गजेंद्र यादव हा पळत आला. तेव्हा मी त्याला काय झाले अशी विचारणा केली असता, त्याने सांगीतले की, पाटणी चौकात कृष्णा पवार याला काही लोक जबर मारहाण करीत आहेत. त्यावरुन मी माझे एमएच ३७ एडी ३८४३ या चारचाकी वाहनाने पाटणी चौक याठिकाणी गेलो असता, तेथे चार जण कृष्णा पवार याला मारहाण (crime) करतांना दिसले.
याबाबत मी त्यांना विचारणा केली असता, त्यापैकी अन्सार, सोहेल, शंका व नाजीर रा. सर्व वाशिम यांनी मला जातीधर्मावर शिवीगाळ केली व नाजीर नावाच्या युवकाने माझ्या कानाखाली थापड मारली. त्यानंतर तेथील सर्व लोक माझ्या अंगावर मारण्यासाठी धावून आले. मी जीवाच्या भितीने तेथून पळ काढला. दरम्यान, मी खाली पडलो तेव्हा मला त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रँकवर आदळले. यावेळी त्यांनी माझ्या गळ्यातील २० ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून घेतली.
दरम्यान, माझा जीव वाचविण्यासाठी मी मराठा स्टील होम या दुकानात शिरलो. तेव्हा दुकान मालक निलेश जीवनानी यांनी दुकानाचे शटर बंद केले. त्यानंतर ते लोक तेथुन पळून गेले, अशा आशयाच्या मयुर चुंबळकर यांच्या फिर्यादीवरुन (Police) शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने व्यापारीवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेतील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली.