चालकावर गुन्हा दाखल परभणीतील गंगाखेड तालुक्यातील घटना
साडे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : वाहनामध्ये अत्यंत निर्दयीपणे बैल या पशुधनाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकावर शनिवार २८ डिसेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अंदाजे सात लाख सदूसष्ट हजार (७, ६७, ००० रुपये) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड येथील जनावरांच्या आठवडी शनिवार बाजारातून बैल घेऊन कोद्री रस्त्याने धर्मापुरीकडे जात असलेले एमएच ०२ इआर २१६६ क्रमांकाचे वाहन गंगाखेड ते कोद्री जाणाऱ्या रस्त्यावर मन्नाथ मंदीराच्या कमानीजवळ थांबविले असल्याची माहिती बळीराम शनिश्वर परांडे वय २७ वर्ष रा. परळी यांनी डायल ११२ क्रमांकावर दिल्याने पोलीस शिपाई सुनिल मामीलवाड, परसराम परचेवाड यांच्यासह सपोनि आदित्य लोणीकर यांनी पशुधन असलेले वाहन (Gangakhed Crime) पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता वाहनातील पशुधन शनिवार बाजारातून खरेदी विक्री केल्याचे व धर्मापुरी येथे घेऊन जात असल्याचे चालक इरफान खय्युम खुरेशी रा. धर्मापुरी ता. परळी याने सांगितले.
या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त (पाच बैल) जनावरे भरून त्यांना वेदना होतील अशा स्थितीत दोरीने बांधून निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचे निर्दर्शनास आल्याने पोलीस शिपाई सुनिल रघुनाथ मामीलवाड वय ३३ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक इरफान खय्युम खुरेशी रा. धर्मापुरी याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Gangakhed Crime) करून सहा लाख रुपये किंमतीचे महींद्रा बोलेरो पिकअप वाहन व एक लाख सदूसष्ट हजार रुपये किंमतीचे पशुधन असा एकूण सात लाख सदूसष्ट हजार (७, ६७, ००० रुपये) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आदित्य लोणीकर करीत आहे.