परभणी (Parbhani):- महायुतीमधील रासपाचे आ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघात भाजपालाच संपविण्याचा डाव चालू केला आहे. त्यांच्या दडपशाहीला भाजपा (BJP)पदाधिकारी व सामान्य जनता कंटाळलेली आहे. तेव्हा येणार्या विधानसभेला(Assembly) आ. गुट्टे यांना महायुतीमधून बाजूला काढा व भाजपाच्या कमळाचा स्वतंत्र उमेदवार द्यावा अशी मागणी गंगाखेड भाजपा पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची भेट घेवून केली. आणि तसे न केल्यास बंड करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा मुळे भाजपाचा आहे
विधानसभा निवडणुकीचे ढग वाहू लागले आहेत. घडामोडींना वेग येत ओह. गंगाखेड मतदारसंघात महायुती मधील राष्ट्रीय समाज पक्ष व भाजपा पक्षात असलेली प्रचंड नाराजी समोर आली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा मुळे भाजपाचा आहे. भाजपातील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी फळी इथे कार्यरत आहे. पण महायुतीमध्ये ही भाजपाची जागा रासपाला सोडण्यात आली. आ, गुट्टे हे जेलमध्ये राहुन विजयी झाले. ते ही भाजपाचा बळावर. परंतु त्यांच्या पाच वर्षाच्या काळात भाजपा पदाधिकारी व रासपा यांच्यात कधीही सौख्य दिसले नाही. उलट वितुष्ठ वाढत गेले. आज विधानसभा मतदारसंघात भाजपा पदाधिकार्यां मध्ये तीव्र नाराजी असून आ. गुट्टे यांचे काम करणार नसल्याचे पदाधिकरी व कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. ही बाब पक्षश्रेष्ठीच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पदाधिकार्यांचे शिष्ठमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांची दोन वेळ भेट घेवून सर्व हकीकत सांगितली.
भाजपाच्या कमळावर ही निवडणुक लढविली जावी, अशी आग्रहाची मागणी
पक्षश्रेष्ठी गांभीर्य लक्षात घेत नसल्याने काही दिवसांपूर्वी पुन्हा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट प्रेदश सदस्य विठ्ठल रबदडे, माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे, माजी जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब जामगे, माजी जिल्हाध्यक्ष रामप्रभु मुंढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष नंदेश्वर बलोरे, जिल्हा सरचिटणीस भागवत बाजगीर, अॅड. व्यकंटराव तांदळे व इतर पूर्णा, गंगाखेड, पालम तालुक्यातील पदाधिकारी यांनी घेतली. या भेटीत मात्र आ. गुट्टे हे आम्हाला नको आहेत. दुसर्या कुणालाही उमेदवारी द्यावी, अशी स्पष्ट मागणी करीत भाजपाच्या कमळावर ही निवडणुक लढविली जावी, अशी आग्रहाची मागणी करण्यात आली. असे न केल्यास यावेळी आम्ही काम करणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवून बंड करणार असल्याचे सांगण्यात आले. या घडामोडीकडे भाजपाने दुर्लक्ष केल्यास गंगाखेड विधानसभेत महायुतीला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.
सक्षम उमेदवार संतोष मुरकुटे
गंगाखेड विधानसभेत भाजपाची ताकद मोठी असून मतदार हा कमळला मतदान करणारा आहे. यापूर्वी भाजपाचा आमदार राहीलेला आहे. निष्ठावंताची मोठी फळी मतदारसंघात आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार म्हणून संतोष मुरकुटे हे आहेत. तेव्हा भाजपाला ही जागा का सोडू नये, असा सवाल पदाधिकार्यांडून उपस्थित केला जात आहे. पाच वर्षात भाजला संपविण्याचे एकमेव काम आ. गुट्टे यांनी केले. ग्रामपंचात व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसतल्यामुळे पदाधिकारी नाराजी व्यक्त करत असल्याची माहिती विठ्ठल रबदडे यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली.