– यास्मिन शेख
मुंबई (MH Legislative Council) : विधान परिषदेच्या (Legislative Council) अकरा जागांपैकी विधानसभेतील संख्याबळाप्रमाणे महायुतीला नऊ, तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांना पाठिंबा देण्यात आला आहे त्यानुसार जयंत पाटील यांनी स्वतःची उमेदवारी घाेषित केली आहे. दुसरी जागा काँग्रेसला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Legislative Council) विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. अकरापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आले तरच निवडणूक होणार आहे. मात्र, अकरा जागेसाठी अकराच उमेदवार रिंगणात उतरले तर ही (Council Election) निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाच आमदार सहज निवडून येऊ शकतात. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे संख्याबळ पाहता प्रत्येकी दोन आमदार निवडून येतील. काँग्रेसचा एक आमदार निवडून येऊ शकतो. (Sharad Pawar) शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या मदतीतून एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
त्यानुसार शिवसेना (Uddhav Thackeray) उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांच्यासाठी एक जागा सोडण्यात आली आहे .तर एक जागेवर कौग्रेस ने प्रज्ञा सातव याना उमेदवारी दिली आहे .
जयंत पाटील म्हणाले, इंडिया आघाडीने सुरुवातीचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात काँग्रेस पक्षाला एक जागा देण्यात आली आहे. (India Alliance) इंडिया आघाडीने दुसरा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर केलेले आहे. तिसरा उमेदवार उभा करायचा की नाही करायचा, याची चर्चा सुरू आहे. त्याबाबतची बेरीज कशी होते, त्यावरच ते ठरेल. सध्या इंडिया आघाडीला महाराष्ट्रात जे वातावरण तयार झाले आहे, त्याला अपयश येऊ नये, अशी (India Alliance) इंडिया आघाडीची भूमिका आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.