देशोन्नतीचे भाकीत खरे ठरले
हिंगोली (MH Legislative Council) : काँग्रेस पक्षातर्फे (Congress Party) राज्यभर अनेक नेत्यांची नावे चर्चेत असतांना डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Pragya Satav) यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाकित देशोन्नतीने यापूर्वीच व्यक्त केले होते. हे भाकित खरे ठरले असून पक्षा तर्फे सोमवारी आ.प्रज्ञा सातव यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्य विधान परिषदेकरीता (Legislative Council) काँग्रेसकडे असलेल्या एकमेव जागेसाठी पक्षाने आ.प्रज्ञा सातव यांचे नाव निश्चित केले आहे. याबाबत देशोन्नतीने यापूर्वीच शक्यता वर्तविली होती. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारीवर शिक्कामोर्तब
कोटा पद्धतीनुसार (Congress Party) काँग्रेस पक्षाला एक जागा मिळणार हे निश्चित होते. सध्या (Legislative Council) विधान परिषद सदस्य असलेल्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Pragya Satav) यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. त्यांना पक्षातर्फे परत संधी मिळेल असे भाकित देशोन्नतीने व्यक्त केले होते. हे भाकित खरे ठरले असून पक्षाचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी सोमवारी एक पत्र काढून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रज्ञा सातवांच्या नावाला मंजुरी दिल्याचे कळविले आहे. विधान परिषदेची उमेदवारी म्हणजे सभागृहाचे सदस्यत्व निश्चित असल्यासारखेच असते. फार मोठी राजकीय उलथापालथ झाली नाही तर निश्चित कोट्यानुसार दिलेले उमेदवार निवडूण येणे निश्चित मानले जात असते.
तक्रारीचा प्रयोग अखेर फसला
लोकसभा निवडणुकी दरम्यान आ. प्रज्ञा सातवांनी आपला विरोध केल्याची तक्रार खा. नागेश पाटील (Nagesh Patil) यांनी थेट काँग्रेस पक्षाकडे केली होती. (Legislative Council) निवडणुका होऊन दोन महिन्यानंतर होणारी ही तक्रार म्हणजे पक्षातील सातव विरोधकांचे कट कारस्थान समजले जात होते. तक्रारीचा हा प्रयोग शेवटी फसला. आ. प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांना पुन्हा एकदा सहा वर्षांसाठी आमदारकी जवळपास निश्चित समजली जात आहे.