रिसोड (Wine Bar Association) : रिसोड येथे दिनांक 20 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात वैट टॅक्स धोरणाबाबत शासनाने वाढवलेला दहा टक्के टॅक्स यासहित दरवर्षी भरमसाठ होणारी परवाना नूतनीकरण फि रद्द करणेबाबत तसेच मध्य विक्रीतून शासनाच्या महसूल वाढण्यासाठी मध्य निर्मितीवर फर्स्ट पॉइंट वर टॅक्स लावन्यात यावा व (Wine Bar Association) अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे.
या आग्रही मागणीसाठी दिनांक 20 मार्च रोजी शहरातील बार असोसिएशनच्या वतीने सर्व (Wine Bar Association) बार बंद करुण आंदोलन करण्यात आले. यावेळी वाशिम जिल्हा लिकर्स बार असोसिएशनचे अध्यक्ष भागवत गाभणे. रिसोड तालुका अध्यक्ष विठ्ठल आंधळे. सचिव बंडू. नाना देशमुख. वामनराव गाभणे. संतोष जाधव. सचिन गिरी. जनार्दन गाभणे. शंकर भांदुर्गे. राजू सैगल. दीपक राउत. यांच्यासहित सर्व होटल कर्मचारी लोकाचि उपस्थिती होती.