पंचायत समिती जवळची घटना
रिसोड () : रिसोड शहरातील पंचायत समिती जवळ असलेल्या एका दुध डेअरीला आग लागून 5 लाख रुपयांचे नुकसान( Milk dairy Fire) झाल्याची घटना दिनांक 31 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता च्या दरम्यान घडली. याबाबत माहिती अशी की, पंचायत समिती जवळ राहुल गोरे यांची रिया दूध डेअरी असून दैनंदिन प्रमाणे 30 डिसेंबर रोजी रात्री ते डेरी बंद करून आपल्या घरी गेले असता पहाटे साडेपाच वाजताच्या दरम्यान काही युवक त्यांचे घरी आले व त्यांना त्यांचे दुकानातून धूर निघत असल्याची बाब सांगितली. राहुल गोरे तातडीने आपल्या डेरीवर पोहोचले.
सदर बाद ही राहुल गोरे यांनी अग्निशमन दल विभागाला जाऊन स्वतः सांगितली.अग्निशमन दल विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन सदर आग आटोक्यात आणली व एक मोठा अनर्थ टळला. मात्र या दरम्यान डेअरी मधील काचाचे फ्रिज,दुध ठेवण्यासाठी चे फ्रिज,आयस्क्रीम फ्रिजर,दोन अन्य फ्रिज,फैट मशिन,पंखा,पिओपी,चॉकलेट व कन्फेशनरी वस्तू याचे मोठे नुकसान (Milk dairy Fire) होऊन यामध्ये 5 लाख रुपयाचे नुकसान झाले. सदर प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनकडून पंचनामा करण्यात आला.