Mumbai:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी आज नाशिक शहरातील मॉर्डन स्कूल(Modern School), सिडको या मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.