बुलडाणा (Siddharth Kharat) : मंत्रालयीन कक्ष अधिकारी ते सहसचिव व केंद्रांसह राज्यातील (Ministry Joint Secretary) विविध मंत्रीमहोदयांकडे स्विय सहाय्यक (पी.ए.) ते खाजगी सचिव (पी.एस.) अशा विविध पदावर प्रो-ऍक्टिव्हली, नाविन्यपूर्ण, निष्कलंक व बेदाग अशी ३० वर्षाची सेवा पूर्ण करून दिनांक १ जुलै २०२४ पासून (Siddharth Kharat) सिद्धार्थ खरात सहसचिव यांनी (voluntary retirement) स्वेच्छा सेवानिवृत्ती (VRS) घेतली आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा मनोदय!
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुर्गम ताडशिवणी सारख्या खेड्यापासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राचे पॉवर हाऊस (Power House) असलेल्या मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचला. या कालावधीत सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, आरोग्य, उच्च व तंत्र शिक्षण व गृह ( बंदरे) इत्यादी विभागात अनेक महत्वपूर्ण निर्णय, धोरणे, मंत्रीमंडळ प्रस्ताव, नवीन कायदे, शासन निर्णय, स्टॅचुट्स, आदेश, प्रशासकीय व कायदेविषयक सुधारणा अशा सार्वजनिक हिताच्या एक ना अनेक बाबी करतांना प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यांना पुढाकार घेता आला.. नविन कायदे, विधि विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यीत विद्यापीठे निर्माण करत असतांना सुमारे ७०-८० मंत्रीमंडळ प्रस्ताव माझ्या हातून सादर करता आले, याचा मनस्वी आनंद असल्याच्या भावना त्यांनी (voluntary retirement) स्वेच्छा सेवानिवृत्ती घेताना व्यक्त केल्या.
विविध मंत्रीमहोदयांकडे काम करतांना सामान्य नागरिकांच्या प्रती काम करतांना मोलाचा अनुभव मिळाला, असे सिद्धार्थ खरात (Siddharth Kharat) त्यांनी सांगून या संपूर्ण कालावधीत वेळेवेळी मार्गदर्शन करणारे वरिष्ठ सहकारी, मित्र परिवार व कुटुंबियांचा भक्कम पाठींबा व समर्थ साथ यामुळेच हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच पुन्हा पुन्हा आपल्या मातीकडे व आपल्या माणसांकडे पाय वळत राहीले. “दुष्काळग्रस्त होते कणसात चार दाणे, पक्षी मला उपाशी हुसकावता न आले.. अवघीच जिंदगी मग झाड होत गेली, मातीत पाय रूतले ते काढता न आले !” अशा काव्यमय भावना शुद्धलेखना त्यांनी शेवटी व्यक्त करून सामाजिक कार्यात काम चालू ठेवण्याचा मानस व्यक्त केला.