मानोरा(Manora):- पोलीस स्टेशन (Police Station) अंतर्गत येत असलेल्या एका गावातील अल्पवयीन युवती २५ जानेवारी ला एका युवका सोबत पळून गेल्याची फिर्याद मानोरा पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a case) करून प्रकरण तपासात घेतले ६ जून ला प्रेमी युगलास औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
गावातील कुटूंब पुणे येथे कामा निमित्त १२ वर्षा पासून कामा निमित्त वास्तव्यास होते
पोलिस सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार मानोरा तालुक्यातील एका गावातील कुटूंब पुणे येथे कामा निमित्त १२ वर्षा पासून कामा निमित्त वास्तव्यास होते. त्या ठिकाणी दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील एका मुलाचे सदर युवती सोबत सूतजुळले हे कुटूंबीयाच्या लक्षात आल्याने ते मानोरा तालुक्यातील मूळगावी राहायला आले. २५ जानेवारी ला आई व मुलगा कामा निमित्त बाहेर गेल्याची संधी साधून मुलगी आपल्या प्रियकर सोबत ९ वाजता निघून गेली तिचा शोध घेतला. ती मिळाली नसल्याने २६ जानेवारी ला युवतीच्या आई ने मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने कलम ३६३ भादवी गुन्हा दाखल (Filed a case) करून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी (MIDC) परिसरातील वैजापूर येथून ६ जून ला ताब्यात घेतले ही कारवाई एपीआय (API) जनार्धन खंडेराव, बिट जमादार दिलीप चव्हाण, जमादार बालाजी महल्ले पाटील यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.