जिंतूर तालुक्यातील घटना; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
परभणी (Minor girl Abuse) : लग्नाचे अमिष दाखवुन १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना जिंतूर तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीतेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरुन दोन आरोपींवर २८ ऑक्टोबर रोजी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत १३ वर्षीय मुलीच्या आजीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने मुलीला लग्नाचे अमिष दाखवुन तिच्या सोबत संबध ठेवले. तर दुसर्या आरोपीने पिडीत व आरोपींना स्वत: चे घर उपलब्ध करुन दिले. वारंवार संबध ठेवल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर (Minor girl Abuse) अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शैलेश घोगरे, गजानन घोगरे या दोघांवर जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि. पुंड करत आहेत.
कापसावर पाणी का टाकले म्हणत विनयभंग
गंगाखेड : कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेस तुम्ही कापसावर पाणी का टाकले या कारणावरुन अश्लिल शिवीगाळ करत झटापट करुन विनयभंग (Minor girl Abuse) करण्यात आला. या घटनेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत कोठे तरी गहाळ झाली. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील कवडगाव शिवारात घडली. पिडीतेच्या तक्रारीवरुन भारत भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.ह. शिंदे करत आहेत.
पाठलाग करत मुलीचा विनयभंग
परभणी : तु माझ्यावर गुन्हा दाखल करुन मला जेलमध्ये टाकले होते. मी तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही असे म्हणत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor girl Abuse) करण्यात आला. ही घटना परभणी शहरातील लोहगाव रोडवर घडली. पिडीतेच्या तक्रारीवरुन अल्ताफ शेख उर्फ राजु कदम याच्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. मुजळगेकर करत आहेत.
२३ वर्षीय महिलेचा विनयभंग
परभणी : घराच्या अंगणामध्ये झाडझुड करत असताना एकाने २३ वर्षीय महिलेचा विनयभंग (Minor girl Abuse) केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील सावळी खु. येथे २९ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरुन आरोपी संतोष चव्हाण याच्यावर जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि. जक्केवाड करत आहेत.