परभणी शहरातील घटना; नवा मोंढा पोलीस ठाण्यात नोंद
परभणी (Minor girl Abusing) : शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दीत राहणार्या एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी २ नोव्हेंबरला दोन आरोपींवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित मुलीच्या (Minor girl Abusing) आईने याबाबत तक्रार दिली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये दुपारच्या सुमारास गंगाखेड रोडवरील एका कॅफेत तसेच २ नोव्हेंबरला रेल्वे स्टेशन परिसरात आरोपीने मुलीवर अत्याचार केला. त्याच प्रमाणे दुसर्या आरोपीने सदर पिडितेला अॅटो मध्ये बसवून पळून नेले. या प्रकरणी मनिष कुरवाळे, रामा काळे या दोघांवर नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
कॉफी शॉपवर नजर ठेवणे गरजचे
मागील काही वर्षात परभणी शहर व परिसरात कॉफी शॉपचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. सदर कॉफी शॉप मध्ये तरुण, तरुणींना निवांतात वेळ उपलब्ध करुन दिली जात आहे. अशा वेळी एखादी अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अल्पवयीन मुले, मुली सर्रास कॉफी शॉपमध्ये जात आहेत. कॉफी शॉपची तपासणी होणे देखील आवश्यक आहे.