परभणी शहरातील सत्कार कॉलनी येथील घटना
परभणी (Minor girl molested Case) : शहरातील सत्कार कॉलनी भागात असलेल्या एका वसतीगृहामध्ये १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तसेच इतर तीन अल्पवयीन मुलींचा देखील विनयभंग (Minor girl molested Case) करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीवर १६ ऑक्टोबर रोजी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nava Mondha Police) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर मुलगी सत्कार कॉलनीतील एका वसतीगृहात वास्तव्यास आहे. सप्टेंबर २०२४ ते १६ ऑक्टोबर या दरम्यान आरोपीने सदर मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. इतर तीन पिडीत अल्पवयीन मुलींची छेडछाड करत (Minor girl molested Case) विनयभंग केला. एका अल्पवयीन मुलीला मारहाण देखील केली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन विकास मुरलीधर कदम (वय ३१ वर्ष) याच्यावर नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तपास सपोनि. बी.आर. बंदखडके करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली.